JOIN US
मराठी बातम्या / Viral / ट्रकपाहून अचानक युटर्न... स्कूटी चालवणाऱ्या तरुणीच्या अजब ड्रायविंगचा Video Viral

ट्रकपाहून अचानक युटर्न... स्कूटी चालवणाऱ्या तरुणीच्या अजब ड्रायविंगचा Video Viral

रस्ते अपघाताचे अनेक लहान मोठ्या अपघातांचे व्हिडीओ देखील आपल्याला सोशल मीडियावर पाहायला मिळतात. त्यांपैकी काही व्हिडीओ हे हृदयाचे ठोके चुकवतात.

जाहिरात

व्हायरल व्हिडीओ

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 1 नोव्हेंबर : व्हिडीओ म्हटलं ही सर्वात पहिलं आपल्याला आठवतं ते म्हणजे सोशल मीडिया , कारण येथे आपल्यालाला इथे अनेक मनोरंजक व्हिडीओ पाहायला मिळतात. ज्यामुळेच हे व्हिडीओ पाहाताना आपला वेळ कसा निघून जातो हे आपलं आपल्यालाच कळत नाही. सध्या एक असा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. जो पाहून तुम्हाला तुमचं हसू आवरणार नाही शिवाय यावर काय बोलावं हेच कळणार नाही. रस्ते अपघाताचे अनेक लहान मोठ्या अपघातांचे व्हिडीओ देखील आपल्याला सोशल मीडियावर पाहायला मिळतात. त्यांपैकी काही व्हिडीओ हे हृदयाचे ठोके चुकवतात. पण सध्या समोर आलेला व्हिडीओ हा मात्र तुम्हाला हसायला भाग पाडेल. या व्हिडीओमध्ये एक तरुणी स्कूटी चालवत असते. तेव्हा रस्त्यात ट्रक आडवा असलेला तिला दिसतो. तसे पाहाता गाडी त्यावेळेला वेगाने येत नव्हती पण तरी देखील ही तरुणी असं काही करते की पाहून तुम्ही म्हणाल ‘‘ओ दीदी…’’ हे ही पाहा : इथे वाहते रक्ताची नदी! Video पाहून अनेकांना वाटलं आश्चर्य वास्तविक, हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुम्हाला वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळेल, अनेक यूजर्स आपल्या अकाउंटवरुन याला शेअर करायला विसरत नाहीत, कारण तो खरंच तितका मनोरंजक आहे. शेअर शेअर केला आहे. हे शेअर करताना सुनील पवार नावाच्या युजरने कॅप्शनमध्ये ‘पापा की परी’ असे लिहिले आहे.

संबंधित बातम्या

या व्हिडीओमध्ये रस्त्याच्या मधोमध एक पिवळ्या रंगाचा ट्रक खडी वळवत उभा असलेला दिसत आहे, यादरम्यान तेथून अनेक दुचाकी स्वार जात आहेत. हे दुचाकी स्वार आधी रस्त्याखाली उतरुन मातीच्या खडबडीत जागेवरुन रस्त्यावर येतात आणि मग पुढे निघून जातात. पण त्या दरम्यान एक तरुणी देखील आपली स्कूटी घेऊन तेथे आली, पण तिने मात्र भलताच प्रकार केला. आपली गाडी रस्त्यावर आल्यावर पुढे निघून जाण्याचं सोडून या तरुणीने आपली गाडी उलटी फिरवली आणि या ट्रकला जाऊन धडक दिली. यादरम्यान स्कूटी ज्या ठिकाणी धडकली त्याच ठिकाणी ट्रकचा चालक उभा होता, मात्र काही क्षणांपूर्वी तो तिथून निघून गेला अन्यथा त्याला दुखापत झाली असती.

मुलगी ट्रकपासून दूर जाण्याऐवजी ट्रकच्या विरुद्ध बाजूने स्कूटीमध्ये शिरते. हे पाहातानाच खूपच मनोरंजक आहे. सध्या या अपघातात कोणीही जखमी झाले नसले तरी त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर धुकाकूळ घालत आहे. कारण या तरुणीने जे केलं आहे. ते खरोखरंच खूप विचित्र आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या