मुंबई, 30 नोव्हेंबर : गाय-बैल, शेळी-मेंढीसारखे पाळीव प्राणी शांतताप्रिय समजले जातात. हे प्राणी मानवावर हल्ला करत नाहीत, असं म्हटलं जातं. मात्र, कधी-कधी याच्या एकदम उलट परिस्थितीचा सामना करावा लागतो. पाळीव प्राणी तोपर्यंतच शांत असतात जोपर्यंत त्यांना माणसाकडून धोका जाणवत नाही. जेव्हा त्यांना धोका वाटतो तेव्हा ते आपल्या मालकावरदेखील हल्ला करतात. त्यामुळे पाळीव प्राण्यांना राग येईल अशी कृती आपण टाळली पाहिजे. नाहीतर संकटाचा सामना करावा लागू शकतो. एका बैलासोबत फोटो क्लिक करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणावर असाच प्रसंग ओढावला आहे. सध्या सोशल मीडियावर एका तरुणाचा आणि बैलाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
@TheBest_Viral या ट्विटर अकाउंटवर अनेकदा आश्चर्यकारक व्हिडिओ पोस्ट केले जातात. नुकताच या अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये एक तरुण बैलाची शिंगं धरताना दिसत आहे. एरवी शेतकऱ्याचा मित्र असलेला बैल राग आल्यानंतर किती हिंसक ठरू शकतो, हे सर्वांनाच माहीत असेल. त्याला राग आला की तो समोरच्या व्यक्तीला पळता भुई थोडी करतो.
हे ही वाचा : अबब! पोटातून एकदोन नाही तर तब्बल 187 नाणी काढली बाहेर, 1.2 किलो भरलं वजन
बैलासोबत फोटो काढणं आलं अंगलट
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक तरुण मूर्खपणाचं कृत्य करताना दिसत आहे. तो शिंग धरून बैलाचं डोकं खाली वाकवताना दिसत आहे. नशेत असल्यासारखा दिसणारा हा तरुण बैलासह कॅमेऱ्यासमोर पोज देत आहे. बैल क्षणभर शांत राहतो. पण, नंतर तो मानेला जोरात हिसका देतो आणि तरुण उडून जमिनीवर पडतो असं या व्हिडिओत दिसतंय.
नेटिझन्सने दिल्या प्रतिक्रिया
या व्हिडिओला जवळपास 11 हजार व्ह्युज मिळाले आहेत तर अनेकांनी कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकानं कमेंट केली आहे की, 900 किलो आणि 72 किलो गटातील कुस्ती सामन्यासारखं हे दृश्य दिसत आहे. "हा तरुण भारतीय क्रिकेटर युजवेंद्र चहलसारखा दिसत आहे," अशीही कमेंट एका युजरनं केली आहे. हा तरुण खूप मूर्खपणा करत असल्याचं काहीचं म्हणणं आहे.
हे ही वाचा : Viral Video: ...जेव्हा माकडाला येतो राग; मग असं फोटोसेशन करणं जाल कायमचे विसरून
एका युजरनं व्हिडिओ रिट्विट करून म्हटलं आहे की, जेव्हा तुम्हाला वाटतं की तुम्ही आयुष्यावर नियंत्रण मिळवलं आहे तेव्हा आयुष्यही असाच झटका देतं. "अशा कृत्यांमुळे माणसं जखमी होतात, तरीही त्यांना आपण निसर्गाच्या शक्तीवर नियंत्रण मिळवू शकतो असं का वाटतं?", अशी कमेंट आणखी एखा युजरनं केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags:Funny video, Social media, Social media viral, Video viral, Viral video.