मुंबई, 8 जानेवारी : तुमच्या विमानानं टेक ऑफ घेतल्यानंतर आता पुढे काय? असा प्रश्न तुम्हाला दरवेळी पडत असेल. विमान स्थिर होईपर्यंत खूप घाबरायलाही होतं. असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय. या विमानाने टेक ऑफ केल्यानंतर विमानाचं एक चाक निखळून पडलं. हा व्हिडिओ बघून अनेकांना धडकी भरली. या विमानाचं पुढे काय झालं असेल असाही प्रश्न पडला.हे विमान कॅनडा एक्सप्रेसचं आहे. हा व्हिडिओ पाहिल्यावर तुमचा विश्वास बसणार नाही पण खरंच असं घडलंय. एका प्रवाशाने विमानातूनच या घटनेचं व्हिडिओ शूटिंग केलं.त्याने ट्विटरवर लिहिलं, मी ज्या विमानात आहे त्या विमानाचं एक चाक निखळलंय. 2020 या वर्षाची सुरुवात चांगली झाली.
या व्हिडिओच्या फूटेजमध्ये टेक ऑफच्या आधी चाकांमधून ठिणग्या बाहेर पडताना दिसल्या. त्यावर एका प्रवाशाने लिहिलं की, असं काही होण्याआधी विमानाचं चाक ठीकठाक वाटत होतं. एकाने लिहिलंय, मी जेव्हा ही बातमी वाचली तेव्हा मला वाटलं, ही चाकं कुठे पडली असतील? पण नंतर कळलं हे विमान टेकऑफच्या नंतर लगेचच पडलं. त्यामुळे दुर्घटना टळली. एका प्रवाशाने लिहिलं, हे खूपच खतरनाक होतं. असं आधी कधीच घडलं नव्हतं. इन्पेक्शन आणि मेन्टेनन्सचं हे अपयश आहे.
=========================================================================