शार्क मासा
नवी दिल्ली, 28 ऑक्टोबर : जगात काही प्राणी असे आहेत, की ते आपल्यासमोर आल्यावर आपण त्यांना घाबरतो. सिंह, चित्ता, वाघ, मगर हे प्राणी अवघ्या काही मिनिटांत माणसाला संपवू शकतात. पण पाण्याखाली आणखी एक अतिशय भयानक प्राणी राहतो, या प्राण्याने केलेल्या हल्ल्याच्या घटना आपल्याला हादरवून सोडतात. हा प्राणी म्हणजे शार्क मासा होय. तुम्ही शार्कशी संबंधित अनेक चित्रपट किंवा टीव्ही शो पाहिले असतील, ज्यात त्यांचा हिंसक चेहराही तुम्ही नक्कीच पाहिला असेल. पण सध्या माशाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक शार्क अतिशय शांत दिसत होता आणि त्याच्यासमोर दोन स्कुबा डायव्हर्स उभी होती. @OTerrifying या ट्विटर अकाउंटवर अनेकदा धक्कादायक आणि हादरवून सोडणारे व्हिडिओ पोस्ट केले जातात. अलीकडेच या अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे, ज्यामध्ये एक प्रचंड शार्क मासा दिसत आहे. शार्क मासा शांत वाटत असला तरी तो प्रत्यक्षात मात्र माणसावरही हल्ला करतो. त्याच्या हल्ल्याच्या अनेक धक्कादायक घटना आतापर्यंत घडल्या आहेत. या पूर्वी आम्ही तुम्हाला शार्कच्या सर्वांत धोकादायक हल्ल्यांबद्दल सांगितलं होतं. त्यामध्ये शार्क माशाने 4 दिवसांत तब्बल 150 लोक मारले होते. मात्र, या व्हिडिओमध्ये सध्या वेगळंच दृश्य पाहायला मिळत आहे. हे वाचा - बाईक खरेदी करण्यासाठी चिल्लर घेऊन पोहोचला तरुण, पुढे जे घडलं ते आश्चर्यकारक व्हिडिओमध्ये पाण्याखाली खूप मासे दिसत आहेत. त्यांच्यामध्ये एक खूप मोठा शार्क मासादेखील आहे. त्याचा आकार इतका मोठा आहे, की समोरचे सर्व मासे त्याच्यासमोर अगदी लहान वाटत आहे. फक्त मासेच नाहीत, तर समोर असलेली दोन माणसं म्हणजे स्कुबा डायव्हर्सही त्याच्यासमोर अगदी छोटेसे दिसत आहेत. ते दोघं जण एका मोठ्या दगडामागे लपले आहेत आणि त्यांच्यासमोर एक मोठा शार्क मासा पोहत आहे. तो मासा त्यांच्याकडे बघत आहे. त्याचा आकारच नाही, तर त्याचे दात एवढे मोठे आहेत, की त्याने त्या दोघांवर हल्ला केला तर तो एकाचवेळी दोघांचा जीव घेईल.
तो मासा त्यांच्या अगदी जवळ जातो, त्यामुळे तो हल्ला करण्याच्या तयारीत आहे, असं दिसतं. पण पण व्हिडिओच्या शेवटपर्यंत शार्क त्यांना काही करत नाही, फक्त तोंड उघडताना दिसत आहे. शार्क एकाच्या तर अगदी जवळ येऊन त्याला स्पर्श करताना दिसत आहे पण काहीही करत नाही.
हा व्हिडिओ खूप व्हायरल होत असून, याला आतापर्यंत 20 लाखांहून अधिक व्ह्युज मिळाले आहेत, तर अनेकांनी कमेंट करून प्रतिक्रिया दिल्या आहेत. एक युजर म्हणाला, की ते डायव्हर्स इतके घाबरले असतील, की त्यांचे पाय थरथरत असतील. तर, शार्क आश्चर्यकारक प्राणी असून त्यांचे आकार वेगवेगळे आहेत. त्यामुळे बहुतेक शार्क एकमेकांपेक्षा वेगळे दिसतात, असं आणखी एकाने म्हटलंय.