व्हायरल बातम्या
नवी दिल्ली, 27 जानेवारी : आरोग्याच्या समस्येमुळे किंवा सारख्या खाण्याच्या सवयीयमुळे अनेकांचं वजन खूप जास्त वाढलेलं असतं. वाढत्या वजनाला कंटाळून लोक अनेक वेगवेगळ्या गोष्टी अवलंबताना दिसतात. अशातच मुलीच्या वाढच्या वजनाला कंटाळून एका आईने मोठं पाऊल उचलल्याचं पहायला मिळालं आहे. मुलीच्या वाढत्या वजनाला उपाय म्हणून आईने काय केलं हे वाचून तुम्हीही थक्क व्हाल. NYT च्या रिपोर्टनुसार, यूकेमधील 25 वर्षीय हॉली विल्यम्सची मुलगी हार्लो एक दुर्मिळ आजाराशी झुंज देत आहे. प्राडर विली सिंड्रोम असं या आजाराचं नाव आहे. या दुर्मिळ आजारामुळे 5 वर्षीय हार्लोचे वजन 45 किलो आहे. या आजारामुळे हार्लोला सतत भूक लागते. जेव्हा तिला काही खायचं दिसतं तेव्हा ती खायला धावते. त्यामुळे विल्यम्सला तिच्या किचनला कुलुप लावावे लागले आहे. हेही वाचा - रुसलेल्या बॉयफ्रेंडसाठी मुलीनं लिहिलं हटके लव्ह लेटर, हसून हसून व्हाल लोटपोट हॉली विल्यम् म्हणाली, हार्लो जसजशी मोठी होतेय तसतसे तिच्यावर आणखी उपाय करावे लागणार आहेत. मला तिच्यावर निर्बंध घालावे लागतील. ती सहा महिन्याची असताना तिला हा आजार झाला आहे. डॉक्टरांनी सांगितले, हॉर्लोमध्ये क्रोसोमोस नाही, जे भूक नियंत्रण करण्यासाठी मदत करतं. त्यामुळे तिला कितीही खाल्ले तरी तिचे पोट भरत नाही. तिला आणखी खाऊ वाटतं.
दरम्यान, तज्ञांच्या मते हा एक दुर्मिळ आजार आहे. यूकेमध्ये जन्मलेल्या प्रत्येक 15,000 मुलांपैकी एकामध्ये आढळतो. यावर अद्याप कोणतेही उपचार आढळले नाही. त्यामुळे सध्या तरी खबरदारी बाळगणं हाच एक उपाय या दुर्मिळ आजारावर आहे.