JOIN US
मराठी बातम्या / Viral / विमानात असं काही घडलं की क्रू मेंबर्ससह सगळेच म्हणाले 'कबुतर जा जा', पाहा लय भारी VIDEO

विमानात असं काही घडलं की क्रू मेंबर्ससह सगळेच म्हणाले 'कबुतर जा जा', पाहा लय भारी VIDEO

विमान धावपट्टीवरून उड्डाण घेण्याआधी हा संपूर्ण प्रकार घडल्यानं गोंधळ निर्माण झाला होता.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

अहमदाबाद, 29 फेब्रुवारी : गो एअरच्या विमानात कबूतर घुसल्यानं मोठा गोंधळ निर्माण झाला होता. या कबूतरांना विमानातून बाहेर काढण्यासाठी कर्मचाऱ्यांची बरीच तारांबळ उडाली. विमान धावपट्टीवरून उड्डाण घेण्याआधी हा संपूर्ण प्रकार घडल्यानं गोंधळ निर्माण झाला होता. सर्व प्रवासी आपल्या आसनावर बसले असताना सामानाचे शेल्फ उघडताना अचानक दोन कबूतर बाहेर आले. ही कबूतरं विमानात इकडे तिकडे सैरभैर उडू लागली. त्यामुळे प्रवाशांचा गोंधळ उडाला. अहमदाबाद एअरपोर्टवर गो एअरचे जी 8-702 विमान टेक ऑफ करण्यापूर्वी कबूतरांनी विमानात घुसखोरी केली. तिथे उपस्थित असलेल्या क्रू मेंबर्सना या कबूतरांना बाहेर घालवताना फार तारांबळ उडाली. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ उपस्थित प्रवाशांची आपल्या कॅमेऱ्यात कैद करत सोशल मीडियावर शेअर केल्यानं तो तुफान व्हायरल झाला आहे.

संबंधित बातम्या

हेही वाचा-याला म्हणतात जुगाड! होळीसाठी चक्क पाण्याच्या टॅंकरमधून आणली दारू शुक्रवारी संध्याकाळी अहमदाबादवरुन जयपूर आलेल्या विमानात हा प्रकार घडला आहे. एका प्रवाशाने आपली बॅग ठेवण्यासाठी विमानातील लगेजचे शेल्फ उघडले. त्याचवेळी दोन कबूतरं बाहेर आली आणि विमानात सैरभैर होऊन उडू लागली. कबूतरांना पकडण्याचा काही प्रवाशांनी प्रयत्न केला. मात्र तो असफल ठरला. क्रू मेंबरने गोंधळ उडालेल्या प्रवाशांना शांत करून जागेवर बसण्यास सांगितले. त्यानंतर विमानाचा दरवाजा उघडून कबूतरांना विमानातून बाहेर काढण्यात आले. हेही वाचा-आई शप्पत! सापानं गिळलेला टॉवेल डॉक्टरांनी खेचून काढला बाहेर, पाहा VIDEO

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या