चेन्नई, 24 मार्च : सध्या सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ (Video Viral On Social Media) जलद गतीने व्हायरल होत आहे. ज्यात काही शाळेतील विद्यार्थी बिअर पिताना दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हिडीओ तामिळनाडूतील चेंगलपट्टी जिल्ह्यातील आहे. ज्यात चालत्या बसमध्ये विद्यार्थी-विद्यार्थिनी बिअर पिताना दिसत आहे. इंडिया टुडेच्या एका रिपोर्टनुसारस हा व्हिडीओ विद्यार्थ्यांपैकी एकाने शूट केला आणि सोशल मीडियावर अपलोड केला. मिळालेल्या माहितीनुसार, हे सर्व विद्यार्थी चेंगलपट्टूच्या (Tamilnadu News) एका सरकारी शाळेतील आहे. जेव्हा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला तर दावा केला जात होता की, हा व्हिडीओ खूप जुना आहे. मात्र नंतर ही घटना मंगळवारची असल्याचं समोर आलं. स्थानिक मीडियामध्येही हे वृत्त दाखवण्यात आलं. हे ही वाचा- हृदयस्पर्शी! मध्यरात्री रस्त्यावर धावत होता तरुण; लिफ्ट घेण्यासही नकार, कारण जाणून पाणावतील डोळे, VIDEO हे सर्व विद्यार्थी आपल्या शाळेच्या गणवेशात तिरुकाझुकुंद्रममधून ठाचुरला जाणाऱ्या बसमध्ये होते. सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राज्यात खळबळ उडाली.
जिल्हा अधिकाऱ्यांना जेव्हा या घटनेबद्दल विचारलं की, त्यांनी सांगितलं की, या घटनेनंतर कारवाई करण्यात आली आहे, स्थानिक पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत. तपास पूर्ण झाल्यानंतर योग्य ती कारवाई करण्यात येईल.