JOIN US
मराठी बातम्या / Viral / मुलाच्या स्टाईलने सगळेच थक्क, स्कूटीवर बसण्याचा हटके अंदाज होतोय व्हायरल, पाहा Video

मुलाच्या स्टाईलने सगळेच थक्क, स्कूटीवर बसण्याचा हटके अंदाज होतोय व्हायरल, पाहा Video

विद्यार्थ्यांना शाळेत सोडण्यासाठी सहसा बस लावली जाते किंवा पालक स्वतः त्यांना शाळेत सोडण्यासाठी जातात.

जाहिरात

व्हायरल व्हिडीओ

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 24 जानेवारी : विद्यार्थ्यांना शाळेत सोडण्यासाठी सहसा बस लावली जाते किंवा पालक स्वतः त्यांना शाळेत सोडण्यासाठी जातात. काही खोडसाळ मुले असतात जे कायमच काही ना काही विचित्र गोष्टी किंवा मस्ती मजा करताना दिसून येतात. त्यांच्या अशा खोडसाळपणामुळे पालक त्यांच्यावर कायमच ओरडत असतात. अशाच एका खोडसाळ मुलाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चालत्या गाडीवर तो काय करतोय हे पाहून तुम्हीही थक्क व्हाल. एका मुलाचा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. जो त्याच्या आईसोबत स्कूटीवर दिसतोय. या दरम्यान, मुलाने शाळेचा ड्रेस परिधान केला आहे आणि त्याच्या खांद्यावर बॅग घेतली आहे. व्हिडीओमध्‍ये मूल खूप उदास दिसत आहे, त्‍यामध्‍ये त्‍याला शाळेत जायचे नसून त्‍याची आई बळजबरीने शाळेत नेत असल्याचे दिसून येत आहे. एवढंच नाही तर तो स्कूटीवर मागे बसला असून त्याने एक साईडला तोंड करत मांडी घातली आहे. हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होतोय. हेही वाचा -  मित्राच्या लग्नात मोठ्याने ओरडत बोलला असं काही…,नवरीच्या चेहऱ्यावरचं हसूच झालं गायब या मुलाच्या व्हिडीओवर अनेक प्रतिक्रिया येत असून त्याचा तोलही जाऊ शकतो, असे नेटकरी म्हणत आहेत. यूजर्स म्हणत आहेत, गाडीचा तोल जराही गेला तरी मुलगा गाडीवरुन वाईटरित्या पडू शकतो आणि गंभीर दुखापत होऊ शकते. याशिवाय मुलाने चप्पलही घातलेली दिसत नाही. त्यामुळे मुलाला जबरदस्तीने शाळेत चालवलं असल्याचा अंदाज नेटकरी लावत आहेत. या व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे.

दरम्यान, Dasad Latif नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला दोन लाखांपेक्षा जास्त लाईक्स आले असून निरनिराळ्या कमेंट येत आहेत. असे अनेक हटके व्हिडीओ सोशल मीडियावर गराळा घालत असतात. शाळकरी मुलांचे अनेक व्हिडीओंना नेटकरी पसंती दर्शवताना दिसत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या