बंगळुरू, 13 ऑगस्ट : कर्नाटकातील मांड्या जिल्ह्यातून एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. आईने प्रसंगावधान राखत लेकाचा जीव वाचवला आहे. थरकाप उडवणारी ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आई आपल्या मुलाला शाळेत सोडण्यासाठी जात होती. मुलगा घराबाहेर पडताच त्याचा पाय उंबरठ्याखाली बसलेल्या कोब्र्यावर पडला. यानंतर मुलाने मागे वळून पाहिलं तर कोब्र्याने फणा काढला होता. तो मुलाला काही करणार इतक्यात त्याच्या आईने पाहिलं आणि मुलाला मागे खेचलं. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. VIDEO - स्कूटीच्या फ्रंट पार्टमधून येत होता विचित्र आवाज; उघडताच फणा काढून उभा राहिला साप आणि…
सोशल मीडियावर युजर्सनी आईच्या प्रसंगावधानाचं कौतुक केलं आहे. थोडासाही उशीर झाला असता तर मोठा अपघात होऊ शकला असता.