JOIN US
मराठी बातम्या / Viral / OMG! बॅगमध्ये सापडली सर्वात विषारी सापाची 23 अंडी, अजबच दिसणारा अंड्यांचा Photo Viral

OMG! बॅगमध्ये सापडली सर्वात विषारी सापाची 23 अंडी, अजबच दिसणारा अंड्यांचा Photo Viral

सध्या काहीशा विचित्र दिसणाऱ्या अंड्यांचे फोटो व्हायरल (Egg photos Viral) होत आहेत. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल, की या अंड्यांमध्ये जगातला सर्वांत विषारी प्राणी असतो. होय, ही एका अत्यंत विषारी सापाची (Venomous Snake) अंडी आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 13 फेब्रुवारी: तुम्ही केव्हा ना केव्हा कोणत्या तरी प्राण्याची/पक्ष्यांची अंडी (Eggs) पाहिली असतील. कधी कोंबडीची अंडी खाल्ली असतील. घरात किंवा प्राणी संग्रहालयात इतर पक्ष्यांची अंडीही तुम्ही पाहिली असतील. जगात असे अनेक प्राणी आहेत, की जे पक्ष्यांच्या श्रेणीत येत नाहीत, परंतु, ते अंडी घालतात. अंड्यांविषयी चर्चा करण्याचं कारण म्हणजे सध्या काहीशा विचित्र दिसणाऱ्या अंड्यांचे फोटो व्हायरल (Egg photos Viral) होत आहेत. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल, की या अंड्यांमध्ये जगातला सर्वांत विषारी प्राणी असतो. होय, ही एका अत्यंत विषारी सापाची (Venomous Snake) अंडी आहेत. ‘डेली स्टार’च्या वृत्तानुसार, ऑस्ट्रेलियन स्नेक कॅचर ग्रुपचे (Australian Snake Catcher Group) मालक शॉन केड यांनी सांगितलं, की ‘काही दिवसांपूर्वी एका सापानं माझ्या बॅगेत 23 अंडी घातली होती. मी जेव्हा ही अंडी पाहिली तेव्हा मला प्रथम फारसं आश्चर्य वाटलं नाही. परंतु, जेव्हा मी अंड्यांवर प्रकाश टाकून ती अंडी पाहिली तेव्हा मला त्यांच्यातले जीव दिसले. या अंड्यांच्या आत जगातले सर्वांत विषारी प्राणी आहेत,’ असं शॉननं त्या वेळी सांगितलं. हे वाचा- जेव्हा आपसात भिडले 2 किंग कोब्रा; अंगावर काटा आणणारा VIDEO, रंजक आहे लढाईचं कारण न्यू साउथ वेल्समधले स्नेक कॅचर शॉन यांनी सांगितलं, की ‘ही अंडी इस्टर्न ब्राउन स्नेक (Eastern Brown Snake) या जगातल्या सर्वांत विषारी सापाची आहेत. हा साप ऑस्ट्रेलियातला दुसऱ्या क्रमांकाचा सर्वांत धोकादायक साप आहे आणि विषाच्या तीव्रतेच्या बाबतीत तो जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याची लांबी सात फुटांपर्यंत असू शकते. सापाने माझ्या एका बॅगमध्ये अंडी घातली, हा एक अत्यंत दुर्मीळ क्षण आहे. कारण हा साप जंगलात अंडी घालतो आणि नंतर ती सोडून देतो.’ हे वाचा- बापरे! AirAsia च्या फ्लाइटमध्ये साप घुसल्याने उडाली खळबळ; VIDEO VIRAL ‘इस्टर्न ब्राउन सापाची अंडी चामड्यासारखी आणि खूप मऊ (Soft) असतात. ती पक्ष्यांच्या अंड्यांसारखी कठीण नसतात. त्यामुळे त्यांना मॉइश्चरची गरज असते. आता ही अंडी मार्चपर्यंत उबतील; पण त्या 23 अंड्यांपैकी फक्त 6 अंडी आधी उबतील असं दिसतंय. अंड्यांमधून बाहेर पडल्यानंतर लगेचच या सापांना जंगलात सोडावं लागतं. कारण ते जन्मतःच विषारी असतात. हा साप जेव्हा दंश करतो, तेव्हा त्याचे विष थेट रक्तवाहिन्यांवर परिणाम करते आणि काही मिनिटांतच ह्रदयविकाराचा झटका (Heart Attack) किंवा रक्तस्रावामुळे व्यक्तीचा मृत्यू होतो,’ असं शॉन केड यांनी सांगितलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या