JOIN US
मराठी बातम्या / Viral / नागाच्या दमदार एन्ट्रीमुळे ट्रॅफिक जाम; महामार्गावर वाहनांच्या लांब रांगा, पाहा VIDEO

नागाच्या दमदार एन्ट्रीमुळे ट्रॅफिक जाम; महामार्गावर वाहनांच्या लांब रांगा, पाहा VIDEO

बऱ्याचदा आपण गाडी घेऊन जाताना समोर प्राणी किंवा साप अडवा आल्याच्या घटना घडतात.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

लखनऊ, 01 सप्टेंबर : बऱ्याचदा आपण गाडी घेऊन जाताना समोर प्राणी किंवा साप अडवा आल्याच्या घटना घडतात. पण एका नागानं तर चक्क अख्खा महामार्ग रोखून धरला. जवळपास काही मिनिटं हा साप महामार्गावर फणा काढून ठाण मांडून बसला होता. त्यामुळे महामार्गावर लांबच लांब रांगा लागल्या होत्या. अनेकजण गाडीतून उतरून नेमका काय प्रकार आहे हे पाहण्यासाठी आले तर रस्त्याच्या मध्यभागी साप पण कुणालाही बराचवेळ त्याला हटवण्याचं धाडस होत नव्हतं. लखनौ-दिल्ली राष्ट्रीय महामार्गावरील गजरौला परिसर ही घटना समोर आली आहे. स्थानिकांनी या घटनेचा व्हिडीओ कॅमेऱ्यात कैद केला आहे. रस्त्याच्या मध्यभागी साप आला तेव्हा सगळ्यांनी गाडी थांबवली. महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी गाड्यांची लांबच लांब रांगा होत्या.

हे वाचा- आधी कोरोना आता अस्मानी संकट, विदर्भातील पुराची भीषणता दाखवणारा VIDEO साप सुमारे तासभर रस्त्यावर राहिल्यानंतर रस्त्या क्रॉस करून निघून गेला. त्यावेळी सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला. साप जंगलाच्या दिशेनं निघून गेल्यानंतर तासाभरापासून जाम झालेलं ट्रॅफिक हळूहळू सुरळीत झालं पण नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. अनेक जण वेगान गाडी चालवत असणाऱ्यांच्या स्पीडवर नकळत या सापामुळे नियंत्रण आल्याचीही माहिती मिळाली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या