JOIN US
मराठी बातम्या / Viral / 'फोन, लहान मुलं बॅन आणि...', पाहुण्यांसाठी नवरीच्या विचित्र अटी; वाचून म्हणाल, 'असं लग्न नको गं बाई'

'फोन, लहान मुलं बॅन आणि...', पाहुण्यांसाठी नवरीच्या विचित्र अटी; वाचून म्हणाल, 'असं लग्न नको गं बाई'

लग्नात येणाऱ्या पाहुण्यांसाठी नवरीबाईने तब्बल 13 विचित्र नियम बनवले आहेत.

जाहिरात

प्रतीकात्मक फोटो

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

लंडन, 26 एप्रिल : लग्न म्हटलं की धम्माल-मजा-मस्ती आलीच. मेहंदी, हळद, संगीत, लग्न यासाठी हौशने ठरवलेला ड्रेसकोड सोडला तर तसे लग्नात कोणतेच नियम बिलकुल नसतात. पण एका नवरीबाईने मात्र आपल्या लग्नात इतक्या विचित्र अटी ठेवल्या आहेत की लग्नात जाण्यासाठी उत्सुक असणारेही असं लग्न नको रे बाबा असंच म्हणतील. यूकेतील या महिलेचं लग्न तिच्या विचित्र अटींमुळे चर्चेत आलं आहे. यामुळे ही महिला ट्रोलही झाली आहे (Woman trolled for making wedding rules for guests). केनेडी मार्क्स (Kennedy Marks)  असं या महिलेचं नाव आहे. ती प्लायमाउथमध्ये (Plymouth) राहते. ज्या बॉयफ्रेंडसोबत ती दोन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहे, त्याच्याशी ती लग्नगाठ बांधणार आहे. पण तिने आपल्या लग्नात येणाऱ्या पाहुण्यांसाठी तब्बल 13 विचित्र नियम बनवले आहेत. हे नियम काय आहेत पाहुयात. 1. नवरीशिवाय दुसरं कुणीच पांढरा ड्रेस घालणार नाही. 2. लहान मुलांना सोबत आणायचं नाही. (परवानदी आवश्यक) 3. आमंत्रण फक्त एका व्यक्तीसाठी असेल. सोबत दुसऱ्या व्यक्तीला आणू नये. 4. कोणती मोठी घोषणा करू नये. 5. परवानगी दिली जात नाही तोपर्यंत कुणीच मायक्रोफोनचा वापर करायचा नाही. हे वाचा -  कोल्हापूरहून पुण्यात धडधडत्या हृदयाचा प्रवास! तब्बल 270 किमी अंतर अवघ्या 150 मिनिटांत पार केलं 6. मला कोणता त्रास किंवा चिंता देऊ नका, माझ्या आईशी बोला. 7. कंटाळवाण्या लोकांनी येऊ नये. 8. जर मी किंवा मात्र नवरा तुम्हाला आधी भेटला नसेल तर कृपया लग्नात येऊ नये. 9. कर्मचाऱ्यांशी चुकीचं वागू नये नाहीतर लग्नातून बाहेर काढलं जाईल. 10.  लग्नात कुणी फोन आणायचा नाही. 11. जेव्हा मी पहिल्यांदा डान्स करेन तेव्हा जर दुसरं कुणी डान्स फ्लोअरवर असेल तर त्या व्यक्तीला तिथून हटवलं जाईल. 12.पाहुणे आरामदायी वाटतील असं काहीही घालून येऊ शकतात. 13.  माझे फोटो काढून झाल्यानंतर तुम्ही तुमचे फोटो काढण्यासाठी फोटोग्राफर घेऊ शकता. हे वाचा -  ‘फोनवर इतर कुणाशी का बोलते?’, GF ने दिलं असं सॉलिड उत्तर; BF आयुष्यात चुकूनही पुन्हा विचारणार नाही प्रश्न या अटी पाहून तुम्हालाही हसावं की रडावं तेच समजत नाही आहे ना? सोशल मीडियावरही या नवरीबाईची खिल्ली उडवली जाते आहे. पण असं करण्यामागील नेमकं कारण काय आहे, हेसुद्धा या नवरीने सांगितलं. आपण 8 वर्षांचे होते तेव्हापासून लग्न करण्याची हौस होती. आता आपलं स्वप्न पूर्ण होणार आहे, त्यामुळे हा क्षण खराब करायचा नाही, असं तिचं म्हणणं आहे.  आपण मनाने चांगल्या आहोत. पण फक्त लग्नासाठी हे नियम बनवल्याचं तिने स्पष्ट केलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या