बीजिंग, 21 मे : छत्री (Umbrella) पाहिल्यावर तुमच्या मनात काय विचार येतो? पावसापासून माणसाचं रक्षण करणं हे तिचं पाहिलं काम होय. अनेक जण उन्हापासून संरक्षण व्हावं यासाठीदेखील छत्रीचा वापर करतात. पण छत्री म्हणजे पावसाळाच समोर येतो. पावसाच्या पावसात तुम्हाला भिजवण्यापासून वाजवते. पण भर पावसात तुमची छत्री उघडली आणि तिच्यातून पाणी टपकायला लागलं तर तुमची पहिली प्रतिक्रिया काय असेल? अगदी 100-500 रुपयांची छत्री असली तरी तुम्ही दुकानदाराला बोलायला मागेपुढे पाहणार नाही; पण आता दोन प्रसिद्ध फॅशन ब्रँड्स (Fashion Brand) एकत्र येऊन एक लाख रुपयांची अशी छत्री विकत आहेत (Rs. 1.27 Lakh Umbrella), जी पावसाळ्यात काहीच कामाची नाही. हे ऐकून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. फॅशनच्या दुनियेत टॉप समजला जाणारा Gucci आणि स्पोर्ट्सवेअरचा आघाडीचा ब्रँड Adidas हे या छत्रीची विक्री करत आहेत. ही छत्री 11,100 युआन म्हणजेच भारतीय चलनानुसार सुमारे 1 लाख 27 हजार रुपयांना विकली जात आहे. वीबो (Weibo) या चीनमधल्या सोशल मीडिया वेबसाइटवर सध्या या लाखो रुपयांच्या निरुपयोगी छत्रीची जोरदार चर्चा आहे. हे वाचा - काहीही! तब्बल 48 हजार रुपयांचे बूट, फोटो पाहून नेटिझन्स म्हणाले…. ही छत्री इटलीत (Italy) तयार करण्यात आली आहे. यात आठ ताड्या आहे आणि त्या लाकडी हॅंडलला जोडण्यात आल्या आहेत. छत्रीला लूक येण्यासाठी हिरव्या आणि लाल रंगाचं जाळीदार कापड वापरण्यात आलं आहे. या छत्रीवर आदिदासचा लोगो आहे, तर खालच्या बाजूला हँडलवर Gucci चा लोगो लावण्यात आला आहे.
Gucci च्या वेबसाइटवरच्या माहितीनुसार, ही छत्री वॉटरप्रूफ (Waterproof) नाही. केवळ उन्हापासून संरक्षण मिळावं, या दृष्टिकोनातून ती तयार केली गेली आहे. ही छत्री पावसात निरुपयोगी ठरेल; मात्र उन्हात सावली देईल आणि फॅशन म्हणून वापरता येईल, असं या पोस्टमध्ये स्पष्टपणे म्हटलं आहे. हे वाचा - असा काय गुन्हा झाला? फक्त लेकीचा Social media Video लाइक केला म्हणून आईला डांबलं तुरुंगात हे उत्पादन केवळ छत्री या श्रेणीत वर्गीकृत केलं असून त्याचा छत्रीचे काहीच गुण नाहीत. यामुळे हे दोन्ही ब्रँड्स चीनमध्ये विचित्र पद्धतीनं ट्रोल होत आहेत. ‘जे ब्रँड्स वास्तववादी विचार करू शकत नाहीत, त्यांना पैसे का द्यायचे? यापेक्षा आपण स्थानिक वस्तूंचा वापर करू या’, अशा प्रतिक्रिया चिनी नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत.