मुंबई, 31 ऑगस्ट: डान्स करणं कुणाला आवड नाही? मनमोकळे पणानं डान्स करण्यासाठी कोणतच वयाचं बंधन नसतं. असाच एका सुपरडान्सर आजींचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हेलनचं प्रसिद्ध गाणं पिया तू अब तो आजा या गाण्यावर भररस्त्यात वृद्ध महिलांनी मनमोकळेपणानं डान्स केला आहे. त्यांचा डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. pathan ka Baccha नावाच्या ट्वीटर युझरनं हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओवर युझर्सनी भन्नाट कमेंट्स केल्या आहेत. 15 सेकंदाच्या या व्हिडीओमध्ये दोन महिला पिया तू अब तो आजा या हेलनच्या प्रसिद्ध गाण्यावर डान्स करत आहे. आशा भोसले यांनी गायलेलं हे गाणं आजही एव्हरग्रीन आहे. त्यामुळे हे गाणं लागलं की पाय आपोआप थिरकतात.
हे वाचा- अपंगत्वावर मात करून बास्केटबॉल खेळणाऱ्या तरुणाचा VIDEO VIRAL हा व्हिडीओ आतापर्यंत 1 हजारहून अधिक लोकांनी पाहिला आहे. अनेकांनी यावर खूप भारी कमेंट्स केल्या आहेत. काहींनी तर यांचं वयही कळत नाही पण खूप छान नाचण्याची कला यांच्यात आहे. तर काही युझर्सनी या मनमुक्तपणे आपला डान्स कऱण्याचा आनंद घेत असल्याचंही कमेंट्समध्ये म्हटलं आहे. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता गाणं सुरू होताच दोन वृद्ध महिला भन्नाट डान्स करायला सुरुवात करतात. सुरुवातीला यांच्यासोबत एक-दोन जण आणखीन नाचतात मात्र नंतर ते बाजूला होतात आणि या दोन महिला मात्र मनमुरादपणे रस्त्यात नाचत असतात. त्यांच्या या डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.