JOIN US
मराठी बातम्या / Viral / 299KM/h वेगानं सुसाट पळवली सुपरबाईक, तरुणासोबत काय घडलं पाहा VIDEO

299KM/h वेगानं सुसाट पळवली सुपरबाईक, तरुणासोबत काय घडलं पाहा VIDEO

नुसतं 100 ते 120 च्या वर दुचाकीचा स्पीड गेला तरीही अनेकदा धाकधूक होते.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

बंगळुरु, 22 जुलै: नुसतं 100 ते 120 च्या वर दुचाकीचा स्पीड गेला तरीही अनेकदा धाकधूक होते. तर एका तरुणानं शंभर तर सोडाच 300 च्या वेगानं दुचाकी पळवल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कर्नाटकातील बंगळुरू इथला हा व्हिडीओ असल्याचं सांगितलं जात आहे. रस्ते अपघाताच्या दुर्घटना घडत असताना अशा पद्धतीनं वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून सुसाट बाईक चालवणाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. हा तरुण बंगळुरुमध्ये लॉकडाऊनदरम्यान उड्डाणपुलावरून 300च्या वेगानं सुपरबाईक चालवत होता. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. 1 मिनिटाच्या या व्हिडीओमध्ये आपण दुचाकीवरचा स्पीड पाहिला तर आपल्याच काळजात धस्स होईल. सोशल मीडियावर यामाहा आर1 (Yamaha R1) ही सुपरबाईक बॅन करण्याची मागणी या घटनेनंतर अनेक युझर्सनी केली आहे.

हे वाचा- IT क्षेत्रात काम करण्याऱ्यांसाठी मोठी बातमी! ‘या’ तारखेपर्यंत Work From Home बंगळुरू पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या तरुणाला ताब्यात घेण्यात आलं आहे. व्हायरल व्हिडीओच्या आधारे या व्यक्तीचा शोध घेतला असून त्याला अटक करण्यात आली आहे. यापूर्वी एप्रिल महिन्यात अशा प्रकारची सुसाट स्पीडमध्ये जाणाऱ्या एका दुचाकी चालकानं स्टंट केले होते. त्यालाही अटक करण्यात आली होती. त्यानंतर ही दुसरी घटना समोर आली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या