JOIN US
मराठी बातम्या / Viral / सिंहाचा फोटो काढताना झाला आवाज आणि पुढे काय घडलं तुम्हीच पाहा VIDEO

सिंहाचा फोटो काढताना झाला आवाज आणि पुढे काय घडलं तुम्हीच पाहा VIDEO

कारमधून फोटो काढताना त्याने पाहिलं आणि आरामात बसलेला सिंह अलर्ट झाला

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 31 डिसेंबर: आजकाल सोशल मीडियावर सतत वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. टीकटीकॉवर तर वेगवेगळ्या विषयांच्या व्हिडिओने धुमाकूळ घातला आहे. 2019 च्या वर्षात सर्वात जास्त वापलं जाणारं अॅप टीकटॉक ठरलं आहे. भारतात टीकटॉक अॅप वापरण्याला अधिक पसंती दिली जाते. असाच एक TikTokवरचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. तुम्ही जर सिंहाचा फोटो काढत असाल आणि तुमच्या अंगावर सिंह धावून आला तर काय अवस्था होईल? असाच एक TikTok व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ह्या व्हिडिओमध्ये दोन लहान मुलं कारच्या खिडकीतून रस्त्यावर आरामत बसलेल्या सिंहाचा व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न करत आहेत. सिंहाच्या मागे सिंहीणही आरामात बसली आहे. कारमधून फोटो येत नाही हे छोट्या दोन मुलांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी खिडकीची काच खालू करून हात बाहेर काढून फोटो काढताना क्लिकचा आवाज झाला. या क्लिकचा आवाज ऐकून सिंह अलर्ट झाला. त्याने गर्जना केली आणि त्याच्या मागे बसलेली सिंहीणही उठून पुढे निघून गेली. सिंहाच्या गर्जनेमुळे लहान मुलं घाबरली आणि मोबाईल सोडून कारमध्ये पुन्हा आपल्या जागेवर शांतपणे जाऊन बसले.

@rajchakrabortyii watch the full video 😱@tiktok_india #lion #attack ♬ Дикая львица - ALEX&RUS

रस्त्यावर आरामत बसलेल्या सिंहाची अशी अचानक आलेली रिअॅक्शन पाहून लहान मुलांना धडकी भरली. क्षणातच कारचा दरवाजा बंद करून कार तिथून निघून गेली. हा व्हिडिओ पाहून कुणालाही धडकी भरेल. टीकटॉकवर चक्रवर्ती नावाच्या युझरने हा व्हिडिओ #lion #attack हॅशटॅगने अपलोड केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या