मुंबई, 15 जुलै: गेल्या काही दिवसांमध्ये हत्तींच्या व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. कधी खेळताना तर कधी करामती करताना तर कधी हत्तीचं रौद्र रुप दाखवणारे. हत्ती आपापसात कसे भांडतात हे फार दुर्मीळ पाहायला मिळतं. तीन हत्ती आपापसात खाण्यावर भांडत असल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. शेल्ड्रिक यांनी केलेल्या पोस्टनुसार मैशा, रोहो आणि लारो या तीन हत्तींच्या पिल्लांचे खाण्यावरून भांडतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका हत्तीनं तोंडात फांदी पकडली तर दुसऱ्यानं ती हिसकावण्याचा प्रयत्न केला. या दोघांच्या भांडणात तिसरा हत्ती पडला आणि मारामारी सुरू झाली.
हे वाचा- लॉकडाऊनमध्ये पोलिसांनी हातात घेतली बॅट, अशी धुलाई कधीच पाहिली नसेल; पाहा VIDEO या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता दोघांच्या भांडणात तिसरा हत्ती पडला आणि फांदीवरचा पाला खाऊन मोकळा झाला. या दुर्मीळ हत्तीच्या भांडणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओला 688 लोकांनी लाइक केलं असून 125 लोकांनी यावर कमेंट्स केल्या आहेत. हा व्हिडीओ शेल्ड्रिक वाइल्डलाइफ फोटोग्राफरनं ट्वीट केला आहे. सोशल मीडियावर या व्हिडीओ युझर्सनी पसंत केलं आहे.