JOIN US
मराठी बातम्या / Viral / लॅपटॉप चोरून ई-मेल पाठवून चोराने मागितली माफी? पण असं काय घडलं..

लॅपटॉप चोरून ई-मेल पाठवून चोराने मागितली माफी? पण असं काय घडलं..

हा अजब प्रकार सगळीकडेच चर्चेचा विषय बनलाय.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 31 ऑक्टोबर : तंत्रज्ञानाने खूप प्रगती केली आहे. एका क्षणात आपण जगात कुठेही संदेश पाठवतो. सध्याच्या जगात ई-मेल, व्हॉट्सअ‍ॅप याच्या साह्याने मेसेज पाठवणं सोपं झालंय. त्यात ई-मेलचा होणारा वापरही खूप आहे. जगभरात सगळीकडेच ई-मेलचा वापर होतो. पण एकाने आपल्या मालकाचा लॅपटॉप चोरत ई-मेलवर माफी मागितली आहे. ऐकून धक्का बसला ना? पण हे खरं आहे. जाणून घेऊयात याबद्दलचं सविस्तर वृत्त. या बद्दलची माहिती देणारं वृत्त ‘टीव्ही 9 हिंदी’ने दिलंय. हल्ली कुठलीही गोष्ट लगेच व्हायरल होते. अशाच एका ई-मेलबद्दल चांगलीच चर्चा रंगलीय. एका चोराने लॅपटॉप चोरला आणि त्याने लॅपटॉप मालकाला ई-मेलही पाठवलाय. या ई-मेलमध्ये त्याने मालकाची माफीदेखील मागितली आहे. तसंच चोरी करण्यामागचं कारणही सांगितलंय. पाहूयात या चोराने काय म्हटलंय त्या ई-मेलमध्ये. गॉड गुलूवा या ट्विटर अकाउंटवरून एक फोटो शेअर केलाय. हे अकाउंट तक्रारदार लॅपटॉप मालकाचं आहे. या मालकाचा लॅपटॉप चोरी झालाय; पण त्याला आलेल्या ई-मेलमध्ये चोराने आपणच चोरी केल्याची कबुली दिलीय. तसंच आपल्याला असलेल्या पैशांच्या अडचणींमुळे हे कृत्य केल्याचं प्रांजळपणे सांगितलंय. चोराने ई-मेलमध्ये म्हटलंय, ‘भावा कसा आहेस? मीच काल तुझा लॅपटॉप चोरलाय. मला पैशांची चणचण असल्याने मी हे केलंय. मला माझ्या गरजा भागवायला खूप कष्ट पडताहेत. मला कल्पना आहे की, तू एका रिसर्च प्रपोजलवर काम करतोयस. मी तुझी रिसर्च फाईल या ई-मेलसोबत जोडत आहे. तरी तुला इतर काही फाईल्स हव्या असतील तर मला सोमवारी 12:00 वाजेपर्यंत कळवं. म्हणजे तो डाटा पाठवता येईल. कारण, माझ्याकडे लॅपटॉप घेण्यासाठी गिर्‍हाईक आहे. मी लवकरच त्याला लॅपटॉप विकणार आहे. मी जे केलंय त्यासाठी मी माफी मागतो.’ हेही वाचा -  श्वास कोंडला, हार्ट अटॅक आला! खरोखर भयावह ठरली Halloween Party; काय घडलं पाहा 5 VIDEO ट्विटरवर या ई-मेलचा स्क्रीनशॉट लॅपटॉप मालकाने शेअर केलाय. याबद्दल त्याने ट्विटरवर आपल्या भावना व्यक्त केल्यात. मालकाने लिहिलंय, ‘माझा लॅपटॉप काल रात्री चोरीला गेला. चोराने माझाच मेल वापरून मला ई-मेल पाठवलाय. हा ई-मेल पाहून मला काय बोलावं हेच समजत नाहीये.’

संबंधित बातम्या

हा अजब प्रकार सगळीकडेच चर्चेचा विषय बनलाय. आतापर्यंत 2.4 लाख लोकांनी या पोस्टला लाईक केलंय. तर 30 हजारांहून अधिक लोकांनी रिट्विट केलंय. मालकाच्या ट्विटवर नेटिझन्सनी विविध प्रतिक्रिया दिल्यात. काहींना चोराबद्दल सहानुभूती आहे. काहीजणांनी चोराला नोकरीवर ठेऊन घ्या असाही सल्ला दिलाय. इतकंच नाही तर काहीजणांनी चोराकडून लॅपटॉप विकत घेऊन त्याला बदल्यात पैसे द्यावेत असं म्हटलंय.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या