JOIN US
मराठी बातम्या / Viral / सर्वसामान्यांसारखा रस्ता ओलांडत होता तरुण; 23 सेंकदाच्या VIDEO नंतर ठरला रिअल हिरो!

सर्वसामान्यांसारखा रस्ता ओलांडत होता तरुण; 23 सेंकदाच्या VIDEO नंतर ठरला रिअल हिरो!

आपणही अगदी सर्वसामान्यपणे रस्ता क्रॉस करीत असतो. मात्र काही प्रसंग असे घडतात की त्यातून तुम्ही खरे हिरो म्हणून पुढे येता.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात. मात्र काही व्हिडीओ पाहून तुम्हाला त्या व्यक्तीला सॅल्यूट करावासा वाटतो. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनेकांनी या व्हिडीओतील तरुणाचं कौतुक केलं आहे. (Viral Video) काय आहे त्या व्हिडीओमध्ये? रस्त्यावर चालत असताना कधी काय होईल काही सांगू शकत नाही. या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसत आहे की, ती तरुण शांतपणे रस्ता क्रॉस करीत आहे. तरुणासोबत एक मुलगीही आहे. ते दोघे रस्त्याच्या कोपऱ्यावर उभं राहून गाड्या जाण्याची वाट पाहत आहेत. मात्र त्याच वेळी असं काही तरी घडलं की लोक स्तब्ध होतात. नेमक्या त्याच वेळी समोरच्या बाजूने एक लहान मुलगी धावत पुढे येते. रस्ता ओलांडण्यासाठी पुढे येताना अचानक वेगात गाडी येते. समोर उभा असलेला तरुण हे पाहतो आणि मुलीला वाचविण्यासाठी पटकन गाडीच्या समोरून जात मुलीला उचलून घेतो. ही घटना काही क्षणात घडते. मुलाच्या या धाडसाचं मोठं कौतुक केलं जात आहे. हे ही वाचा- महिला एका वर्षात 20 मुलांची झाली आई; देखभालीसाठी 16 जणांची नेमणूक

Rex Chapman नी हा व्हिडीओ ट्वीट केला आहे. एका अनोळखी तरुणाने चिमुरडीला वाचविण्यासाठी आपला जीव धोक्यात घातला. या व्हिडीओला आतापर्यंत लाखो लाइक्स मिळाले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या