भोपाळ, 30 जानेवारी : मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh News) दमोहमध्ये बस स्टँडच्या चौकाजवळ एक तरुण चालत्या बसच्या खाली जाऊन आडवा झाल्याचा प्रकार समोर आला आहे. हा तरूण आत्महत्येचा (Suicide) प्रयत्न करीत होता. बसचं मागचं चाक त्याच्या कमरेवरुन गेलं. मात्र त्यानंतरही तो फार गंभीर झालेला नाही. सुदैवाने तो बचावला आहे. त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. येथे त्याची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचं सांगण्यात आलं आहे. शनिवारी सकाळी घडलेल्या या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज समोर आला आहे. त्याच्या कुटुंबीयांचं म्हणणं आहे की, तो मनोरूग्ण आहे. रुग्णालयाने या तरुणाचं नाव नितेश सेन असल्याचं सांगितलं आहे. तो नोहटाचा राहणारा आहे. तरुण बस स्टँडजवळ फ्रेश-N-फाइन दुकानासमोर उभा होता. समोरून एक बस येत होती. जशी बस तरुणाच्या समोर आली, तो धावत बसच्या खाली आडवा झाला. हे ही वाचा- नवरदेवासोबत मित्रही बसला घोडीवर अन्…; प्रताप पाहून लावाल डोक्याला हात, VIDEO नागरिक सुरुवातील बस ड्रायव्हरची चूक मानत होते.. घटनेनंतर तेथे मोठी गर्दी जमा झाली. येथे उपस्थित लोक बस ड्रायव्हरची चूक मानत होते. मात्र जेव्हा सीसीटीव्ही फुटेज समोर आला, त्यानंतर नेमका प्रकार स्पष्ट झाला. कुटुंबीयांनी सांगितलं की, नितेश शुक्रवारपासून बेपत्ता होता आणि तो घर सोडून निघून गेला होता. नितेशचे काका नरेंद्र सेन यांनी सांगितलं की, त्यांचा पुतणा मनोरूग्ण आहे आणि तो दोन दिवसांपूर्वी घर सोडून निघून गेला आहे.
सुरुवातीला त्यांना वाटलं की तो जवळपासच असेल. मात्र बराच वेळ झाला तरी तो परतला नसल्यानं कुटुंबीयांनी त्याला फोन केला. तेव्हा त्याने जबलपूरला असल्याचं सांगितलं. त्यानंतर तो घरी आला नाही. काल सकाळी पोलिसांनी या घटनेबाबत माहिती दिली.