JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / Viral / काय आहे 'द स्लीपिंग लेडी' या पर्वतामागचं रहस्य? पाहा PHOTO

काय आहे 'द स्लीपिंग लेडी' या पर्वतामागचं रहस्य? पाहा PHOTO

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या ‘द स्लीपिंग लेडी’ हा पर्वताचा फोटो तुम्हीही पाहिला असेल. खरंच असा पर्वत आहे? कुठे आहे? काय आहे त्यामागचं रहस्य?

0107

सोशल मीडियावर सध्या एक सुंदर फोटो व्हायरल होत आहे. त्यात बर्फच्छादित खोऱ्याच्या मध्यभागी झोपी गेलेल्या स्त्रीसारखी एक आकृती दिसते. या आकृतीला 'द स्लीपिंग लेडी' असं नाव दिलं आहे.

जाहिरात
0207

'द स्लीपिंग लेडी' अमेरिकेच्या अलास्का प्रांतात आहे. तिथे या पर्वताला माउंट सुसिटना असे म्हणतात. तो सुमारे 4390 फूट उंच आहे. त्याच्या पश्चिमेला सुसिटना नदी आहे. दुरून पाहिलं तर असं वाटतं की एक स्त्री झोपलेली आहे.

जाहिरात
0307

पण खरोखर या पर्वतावरचं बर्फ एवढं रेखीव आहे? सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या द स्लीपिंग लेडीच्या चित्रासारखा पर्वत मात्र पृथ्वीतला कोठेही नाही आहे. ही एक डिजिटल कला आहे.

जाहिरात
0407

जीन बिहोरेल या कलाकाराने ते साकारलं आहे. त्याच्या कलेची किंमत जवळपास 3000 युरो म्हणजेच 2.65 लाख रुपये ठेवली आहे.

जाहिरात
0507

'द स्लीपिंग लेडी' या नावा सारख्या नावाचे जगात 20 हून अधिक पर्वत आहेत

जाहिरात
0607

'द स्लीपिंग लेडी' किंवा या सारखे नाव असलेले तीन पर्वत अमेरिकेत आहेत.

जाहिरात
0707

जगात ब्रेस्ट शेप हिल, डेड वूमन अशा नावाचेही पर्वत व डोंगर आहेत.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या