JOIN US
मराठी बातम्या / Viral / प्रियकर पडला गर्लफ्रेंडच्या आईच्या प्रेमात; मुलीने सोशल मीडियावर सांगितली आयुष्यातील अडचण

प्रियकर पडला गर्लफ्रेंडच्या आईच्या प्रेमात; मुलीने सोशल मीडियावर सांगितली आयुष्यातील अडचण

या सर्व प्रकारानंतर तरुणीने सोशल मीडियावर आपली अडचण व्यक्त केली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

स्कॉटडेल, 23 ऑगस्ट : यूएसची टिकटॉक स्टार (US Tiktok star) आणि फॅशन-लाइफस्टाइल इन्फ्लुएंसर यांचा एक टिकटॉक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एलिसा किम्बर (Alyssa Kimber) नावाची फॅशन आणि लाइफस्टाइल इन्फ्लुएंसरने Tiktok वर एक व्हिडीओ जारी करीत आईने ‘इनसिक्योरिटी’ जाहीर केली आहे. 26 वर्षीय एलिसा आणि तिच्या आईचे अनेक फोटो सोशल मीडियावर आहेत. या फोटोमध्ये हे ओळखणं कठीण आहे की, यात कोणती आई आणि कोणती मुलगी. ही बाब एलिसासाठी कठीण ठरली आहे. सोशल मीडियावर आई-मुलीच्या जोडीची चर्चा यूटाची फॅशन आणि लाइफस्टाइल इन्फ्लुएंसर एलिसा नेहमीच आपल्या नवनव्या कपड्यांचे फोटो शेअर करीत असतात. कधी कधी ती आपल्या आईसोबतचे फोटो शेअर करते. द सनच्या रिपोर्टनुसार, नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. याला तिने कॅप्शन दिलं आहे की, जेव्हा तुमची 46 वर्षांची आई तुमच्या तुलनेत सुंदर दिसते. आता एलिसा किंबरने (Alyssa Kimber) दावा केला आहे की, तिचा प्रियकर आईच्या प्रेमात पडला आहे. हे ही वाचा- रात्री झोपताना दोघंच होते मात्र सकाळी पाहिलं तर दोनाचे तीन झाले; घरचेही हैराण एका अन्य पोस्टमध्ये ती रागाच्या भरात दिसत आहे. ती लिहिते की, माझे सर्व क्रश माझ्याऐवजी आईला पसंत करीत आहे. यावर एका युजरने लिहिलं आहे की, मी अजूनही गोंधळात आहे. यापैकी कोण आई आणि कोण मुलगी. सोशल मीडियावर एलिसाच्या आईच्या सौंदर्याची मोठी चर्चा सुरू आहे. युजरने विचारलं, तुझी आई सिंगल आहे का? एलिसाच्या पोस्टवर युजर्स कमेंटर करीत आहेत. ज्यामुळे तिची समस्या अधिक वाढली आहे. एका अन्य युजरने विचारलं की, तुझी आई सिंगल आहे का?

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या