JOIN US
मराठी बातम्या / Viral / विद्यार्थी असावा तर असा! शिक्षिका वर्गात येताच मुलाने केलं असं काही...होतोय कौतुकाचा वर्षाव

विद्यार्थी असावा तर असा! शिक्षिका वर्गात येताच मुलाने केलं असं काही...होतोय कौतुकाचा वर्षाव

शाळेतील शिक्षक गुरुप्रमाणे असून त्यांचा आदर करावा असं प्रत्येक विद्यार्थ्याला शिकवण्यात येतं. मात्र फार कमी विद्यार्थी यावर अमल करताना दिसून येतात.

जाहिरात

व्हायरल व्हिडीओ

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 4 फेब्रुवारी : आपल्या मुलांचं चांगलं शिक्षण व्हावं, त्यांना चांगले संस्कार मिळावे, आणि त्यांनी चांगलं वागावं असं प्रत्येकाच्या आई-वडिलांना वाटत असतं. शाळेतील शिक्षक गुरुप्रमाणे असून त्यांचा आदर करावा असं प्रत्येक विद्यार्थ्याला शिकवण्यात येतं. मात्र फार कमी विद्यार्थी यावर अमल करताना दिसून येतात. अगदी काही विद्यार्थी आपल्या शिक्षकांना खरंच गुरुप्रमाणे समजतात आणि त्यांचा आदर करतात. अशाच एका संस्कारी विद्यार्थ्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्याने आपल्या शिक्षकाचं तर मन जिंकलंच मात्र त्याने सोशल मीडियावरही लोकांचं मन जिंकलं आहे. हा व्हिडीओ सध्या सगळ्यांचं लक्ष वेधत आहे. सध्या शाळकरी विद्यार्थ्याचा समोर आलेला व्हिडीओ इंटरनेटवर चांगलाच धुमाकूळ घालत होते. या व्हिडीओमध्ये शाळकरी मुलगा आपल्या शिक्षिकेच्या पायावर फूल ठेवत त्यांचा आशिर्वाद घेताना दिसत आहे. मग शिक्षिका विद्यार्थ्याला आशीर्वाद देतात आणि त्याला उभं करतात आणि प्रेमाने मिठी मारतात. आजच्या काळात अशी मुलं क्वचितच पाहायला मिळतात, ज्यांच्यात मूल्ये संहिता भरलेली असते. हा व्हिडीओ व्हायरल होत असून अनेकांचं मन जिंकत आहे.

संबंधित बातम्या

अप्रतिम व्हिडिओ ट्विटरवर @MahantYogiG नावाच्या अकांउंटवर शेअर करण्यात आला आहे. आणि ‘असे विधी फक्त सनातन धर्मातच शक्य आहेत’ असे कॅप्शन लिहिलं आहे. अवघ्या 9 सेकंदांचा हा व्हिडिओ आतापर्यंत 33 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर 4 हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडिओला लाईकही केले आहे. व्हायरल झालेला हा व्हिडीओ शिक्षक दिनाच्या दिवशीचा असलेला पहायला मिळतोय. या दिवशी विद्यार्थी आपल्या शिक्षकांविषयीचा आदर व्यक्त करत त्यांना धन्यवाद बोलतात.

दरम्यान, हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालत असून चिमुकल्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. शाळेतील शिक्षकांचे आणि विद्यार्थ्यांचे असे अनेक मन जिंकणारे व्हिडीओ समोर येत असतात. नेटकरी अशा व्हिडीओंना चांगली पसंती दर्शवतात. आणि कौतुकाचा वर्षावही करतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या