व्हायरल
नवी दिल्ली, 22 जानेवारी : प्रत्येकाच्या शाळेतील आठवणी खूप खास असतात. शाळेमध्ये आपण घालवलेला वेळ, मित्र, शिक्षक, खेळ, कार्यक्रम या सर्वच गोष्टी आपल्यासाठी स्पेशल असतात. मोठं झाल्यानंतर या वेळेची आठवण प्रत्येकजण काढत असतं. आजकाल आठवणी फोनच्या माध्यमातून टिपता येऊ लागल्या आहेत. त्यामुळे आपण हे क्षण पुन्हा पाहू शकतो. बरेचजण सोशल मीडियावरही याचे व्हिडीओ फोटो शेअर करतात. काही तर मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतात. असाच एक व्हिडीओ सध्या नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. व्हायरल होणारा व्हिडीओ शाळेतील असून यामध्ये काही विद्यार्थी डान्स परफॉर्मन्स करताना दिसत आहे. सामुहिक कार्यक्रमात काही विद्यार्थी डान्स करत असताना शाळेतील शिक्षिकादेखील स्वतःला कंट्रोल करु शकल्या नाही. विद्यार्थ्यांचा डान्स सुरु असतानाच दोन शिक्षिका मधे येत डान्स करु लागल्या. त्यांना पाहून विद्यार्थ्यांनी मोठ्याने ओरडायला आणि टाळ्यांचा गजर करायला सुरुवात केली. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून शिक्षिकेच्या डान्सचं कौतुक करत असून काहीजण त्यांना ट्रोलदेखील करत आहेत.
इन्स्टाग्रामवर yourfunzone नावाच्या हँडलवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. ज्यावर लोक जबरदस्त प्रतिक्रिया देत आहेत. मुलांसोबत नाचणाऱ्या शिक्षिकेच्या उत्कृष्ट डान्स मूव्ह्सही पहायला मिळत आहे. या व्हिडीओ तुफान व्हायरल होत असून नेटकरी व्हिडीओला पसंती दर्शवत आहेत.
दरम्यान, इंटरनेटच्या या युगात दर तासाला वेगवेगळ्या प्रकारचे डान्स व्हिडिओ व्हायरल होतात. सेलिब्रिटींच्या डान्स व्हिडीओशिवाय सर्वसामान्य नागरिकांचे डान्स व्हिडीओही खूप पसंत केले जातात.