नवी दिल्ली, 17 ऑक्टोबर : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh News) गाजियाबादमधून एक व्हिडीओ (Viral Video) समोर आला आहे. ज्यात एक व्यक्ती थुंकी लावून रोटी तयार करीत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओ गाजियाबादमधील सिहानीगेट भागातील एका चिकन कॉर्नरचा असल्याचं सांगितलं जात आहे. व्हिडीओ समोर आल्यानंतर प्रशासनाने कारवाई केली आहे. ही व्यक्ती थुंकी लावून स्वयंपाक करीत असल्याचा व्हिडीओ पाहून लोकांनी संताप व्यक्त केला आहे. पोलिसांनी या प्रकरणातील गांभीर्य लक्षात घेत कारवाई केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. काय आहे त्या व्हिडीओत? व्हायरल व्हिडीओमध्ये व्यक्ती तंदूरी रोटी करीत असताना दिसत आहे. रोटी तयार करीत असताना गव्हापासून तयार केलेल्या रोटीवर तो आधी थुंकतो आणि त्यानंतर ती भट्टीत टाकतो. मात्र कोणाचच त्याच्याकडे लक्ष गेलं नाही. रेस्टॉरंटच्या बाहेर एक व्यक्तीने हा व्हिडीओ शूट केला, जो आता व्हायरल झाला आहे.
रेस्टॉरंटच्या विरोधात गुन्हा दाखल मीडिया रिपोर्ट्सनुसार गाजियाबादमधील पोलीस ठाण्यात यासंदर्भातील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा व्हिडीओ एका चिकन पॉइंटचा असल्याचं सांगितलं जात आहे. हा व्हिडीओ दोन दिवस जुना आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लोकांनी मोठा गोंधळ घातला आणि चिकन पॉइंटविरोधात कारवाई करण्याची मागणी करीत आंदोलन केलं. हे ही वाचा- अजबच! …अन् वेडिंग ड्रेस घालून लग्न मंडपात पोहोचली नवरीची आई; उडाला एकच गोंधळ ज्यानंतर पोलिसांनी हालचाल करीत रोटी तयार करणाऱ्या तमीजुद्दीनने व्यक्तीला अटक करीत तुरुंगात पाठवलं आहे. आणि चिकन पॉइंटच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.