JOIN US
मराठी बातम्या / Viral / 6000 फूट उंच डोंगराच्या कडेवरून झुलत होत्या; अचानक झोपाळा तुटला आणि... काळजाचा ठोका चुकवणारा Shocking video

6000 फूट उंच डोंगराच्या कडेवरून झुलत होत्या; अचानक झोपाळा तुटला आणि... काळजाचा ठोका चुकवणारा Shocking video

उंचावर असलेल्या झोपाळ्यावर बसून अधिक उंच उडण्याच्या हौसेपोटी दोन महिलांनी आपला जीव धोक्यात घातला.

जाहिरात

डोंगराच्या कडेवरून झोपाळा झुलताना महिलांसोबत भयंकर दुर्घटना.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मॉस्को, 16 ऑगस्ट : झोपाळ्यावर बसून उंच उंच उडायला कुणाला आवडत नाही. प्रत्येकाला वाटतं आपण झोपाळ्यावर बसून उंच उडावं. पण काही लोकांना तर यापुढेही जाऊन उंचावर असलेल्या झोपाळ्यावर बसून अधिक उंच उडण्याची हौस असते. अशाच हौसेपोटी दोन महिलांनी आपला जीव धोक्यात घातला. हजारो फूट उंचावर असलेल्या झोपाळ्याचा आनंद त्या लुटायला गेला आणि झोपाळाच (Women fall from swing) तुटला. काळजाचा ठोका चुकवणारा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. रशियातील 6000 फूट उंच डोंगरावर झोपाळा बांधण्यात आला आहे. या झोपाळ्यावर झुलण्यासाठी अनेक पर्यटक येतात. अशाच दोन महिलासुद्धा या झोपाळ्याचा आनंद घेण्यासाठी म्हणून बसल्या. पण त्यांच्यासोबत अशी दुर्घटना घडली की कदाचित या डोंगरावरील काय साध्या जमिनीवरील झोपाळ्यावरही बसायची कदाचित हिंमत करणार नाही. हे वाचा -  VIDEO - अवाढव्य अजगराला चावत राहिली, ओरबडत राहिली; पिल्लाला वाचवण्यासाठी आईने धडपड केली शेवटी… @ShockingClip ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओत पाहू शकता, अगदी डोंगराच्या कडेवर हा लांब आणि मोठा असा झोपाळा आहे. त्यावर दोन महिला अगदी उत्साहात बसतात. मागून त्यांना झोके देण्यासाठी एक व्यक्ती आहे. झोका देताच तो डोंगराच्या अगदी पुढे जातो म्हणजे झोपाळ्यावर झुलताना खाली पाहिलं तर खोल दरी आणि वर उंच आकाशात आणि त्याच्यामध्ये झोपाळ्यातून हवेत उडण्याचा अद्भुत आनंद आणि हो. सोबतच तितकी भीतीसुद्धा. ज्या भीतीचा आवाज या महिलांनी झोका घेताच स्पष्टपणे ऐकू येतोच. पण फक्त हा व्हिडीओ पाहिल्यानंतर आपल्या काळजातूनही जाणवतो.

संबंधित बातम्या

महिलांना झोके घेताना पाहून हा झोपाळा तुटला तर असा विचारही काही क्षण मनात येतो आणि हे काय! खरंच झुलता झुलता झोपाळा एका बाजूने तुटतो आणि झोपाळ्यावरील महिला धाडकन खाली कोसळतात. व्हिडीओ पाहून आपल्या काळजाची धडधडही वाढली. त्या महिलांचा काय झालं असेल, त्या काही वाचल्या नसतील. इतक्या उंचावरून पडून काय त्यांचा जीव वाचणार, अशीच भीती आपल्याही मनात निर्माण होते. हे वाचा -  PHOTO : जवळ असून हरणांनाही दिसला नाही, तुम्हाला सापडतोय का बघा; शिकारीसाठी दबा धरून बसलाय चित्ता पण सुदैवाने  झोपाळा डोंगरापासून फार दूर नव्हता डोंगराच्या अगदी कडेवरच तुटला. जिथं काही अंतरावर खाली एक लाकडी प्लॅटफॉर्म होता, त्यावरच या महिला पडल्या. महिलांचं नशीब बलवत्तर म्हणून त्यामुळे महिलांचा जीव वाचला. त्यांना दुखापत झाली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या