JOIN US
मराठी बातम्या / Viral / हजारो फूट उंचीवर बंद पडलं विमानाचं इंजिन, जीव धोक्यात टाकून पायलटनं केलेल्या खतरनाक स्टंटचा Video

हजारो फूट उंचीवर बंद पडलं विमानाचं इंजिन, जीव धोक्यात टाकून पायलटनं केलेल्या खतरनाक स्टंटचा Video

स्टंट करतानाचा व्हिडिओ शूट करायचा (shooting a video) आणि तो सोशल मीडियावर शेअर करायचा हे जणू काय पद्धतच झाली आहे. असाच सोशल मीडियावर एक व्हिडिओ (going viral on social media) मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 04 एप्रिल: आजकाल स्टंट (stunt) करणं म्हणजे तरुणांसाठी खेळ झाला आहे. स्टंट करतानाचा व्हिडिओ शूट करायचा (shooting a video) आणि तो सोशल मीडियावर शेअर करायचा हे जणू काय पद्धतच झाली आहे. असाच सोशल मीडियावर एक व्हिडिओ (going viral on social media) मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्या व्हिडिओत एक तरुण हवेत हजारो फूट उंचीवर (plane flying) उडणाऱ्या विमानावर खतरनाक स्टंट करताना दिसत आहे. मात्र हे स्टंट करणं कधीकधी जीवावरही बेतू शकतं याचा तरुण वर्ग अजिबात विचार करत नाही. सध्या सोशल मीडियावर समोर आलेल्या एका व्हिडिओमध्ये एक तरुण हजारो फूट हवेत विमान उडवताना दिसत आहे. यादरम्यान अचानक विमानाचे इंजिन बंद पडते. त्यामुळे मोठी दुर्घटना टाळण्यासाठी पायलट अत्यंत धोकादायक निर्णय घेतो. व्हिडिओमध्ये तो तरुण विमानाचे इंजिन ठीक करण्यासाठी विमानातून बाहेर पडताना दिसत आहे.

संबंधित बातम्या

विमानातून बाहेर पडण्यापूर्वी त्या तरुणाला स्वत:ला सुरक्षित ठेवण्यासाठी शरीराला दोरी बांधतो. त्यानंतर तो विमानाचा दरवाजा उघडून बाहेर पडताना व्हिडिओत दिसत आहे. त्यानंतर तो पुढे जाऊन विमानाचा प्रोपेलर चालवण्याचा प्रयत्न करताना दिसतोय. शेवटी प्रोपेलर सुरु होतो आणि तो तरुण पुन्हा विमानात सुखरूप परत येतो. सध्या व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओने सोशल मीडिया यूजर्सच्या भुवया उंचावल्या आहेत. तर काहींच्या अंगावर काटा उभा राहिला आहे. बातमी लिहेपर्यंत या व्हिडिओला सोशल मीडियावर लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. सोशल मीडियाच्या अनेक प्लॅटफॉर्मवर हा व्हिडिओ शेअर केला जात आहे. सध्या व्हिडिओ पाहून आश्चर्यचकित झालेले यूजर्स सतत कमेंट करताना दिसत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या