JOIN US
मराठी बातम्या / Viral / तुम्ही आवडीने खात असलेल्या 'बुढिया के बाल'साठी ही व्यक्ती घेते माणसांच्या डोक्यावरील केस; VIDEO VIRAL

तुम्ही आवडीने खात असलेल्या 'बुढिया के बाल'साठी ही व्यक्ती घेते माणसांच्या डोक्यावरील केस; VIDEO VIRAL

इथं माणसांचे केस देऊन खायला मिळतात म्हातारीचे केस म्हणजे ‘बुढिया के बाल’

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 25 फेब्रुवारी : बुढिया के बाल म्हणजे कॉटन कँडी (Cotton Candy)  तुम्हीही आवडीने खात असाल. कापसासारखा दिसणारा गुलाबी रंगाचा एक गोड पदार्थ. तोंडात ठेवताच विरघळतो. लहान मुलंच नाही तर मोठ्यांनाही खायला आवडतो. अशाच बुढिया के बालचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ज्यात एक व्यक्ती या बुढिया के बालसाठी चक्क माणसांच्या डोक्यावरील केस घेत आहे. तुम्ही आवडीने खात असलेल्या बुढिया के बालसाठी माणसांचे केस घेतले जात आहेत. तुमचेच केस घेऊन बुढिया हे बाल देणारा विक्रेता चर्चेत आला आहे. व्हिडीओ पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. बुढिया के बालच्या बदल्यात हा विक्रेता मानवी केस घेतो आहे. व्हिडीओत पाहू शकता रस्त्यावर कॉटन कँडी विकणाऱ्या विक्रेत्याच्या आसपास बरीच मुलं उभी आहेत. त्यांच्या हातात केस आहेत. प्रत्येक मुलगा हातात केस घेऊन या विक्रेत्याकडे आला आहे आणि विक्रेत्या त्यांच्याकडून केस घेऊन त्यांना कॉटन कँडी देतो आहे. म्हणजे ही व्यक्ती कॉटन कँडीसाठी पैसे घेत नाही, तर केस घेते. म्हणजे केसांच्या बदल्यात केस देते. हे वाचा -  अरे देवा! हे पाहण्याआधी आम्ही…; Maggi PaniPuri video पाहून भडकले नेटिझन्स फुडी विशाल नावाच्या युट्यूब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओत हा विक्रेता सांगतो की तो जितके केस तितकी कॉटन कँडी देतो. तो पैसे घेत नाही.

आता तो पैसे घेत नाही, तर त्याला काय फायदा किंवा या केसांचं तो काय करतो. तर हे केस तो विकतो आणि त्यातून त्याला पैसे मिळतात. एक किलो केसांचे त्याला तीन हजार रुपये मिळतात, असं तो म्हणाला. या केसांचा वापर पुढे विग बनवण्यासाठी केला जातो. हे वाचा -  एटीएम कार्ड सोडा अख्खं ATM मशीनच घरी आणलं; नवऱ्याकडून बायकोला भारी Birthday Gift हा व्हिडीओ पाहून युझर्सनी त्यावर बऱ्याच कमेंट केल्या आहेत. आता हेच पाहणं बाकी होतं, जगात काय काय विकलं जातं आहे, या विक्रेत्याने सलूनजवळ आपलं दुकान टाकायला हवं, अशा प्रतिक्रिया नेटिझन्सनी दिल्या आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या