JOIN US
मराठी बातम्या / Viral / श्वास कोंडला, हार्ट अटॅक आला! खरोखर भयावह ठरली Halloween Party; काय घडलं पाहा 5 VIDEO

श्वास कोंडला, हार्ट अटॅक आला! खरोखर भयावह ठरली Halloween Party; काय घडलं पाहा 5 VIDEO

दक्षिण कोरियातील हॅलोविन पार्टीत भयानक घडलं आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

सिऊल, 29 ऑक्टोबर : हॉलोविन पार्टी… नावानुसारच लोक भूतासारखा गेटअप करून येतात. पण दक्षिण कोरियात अशीच हॅलोविन पार्टी खरोखरच भयावह ठरली आहे. राजधानी सिऊलमध्ये मृत्यूचा तांडव पाहायला मिळाला. याचे धक्कादायक व्हिडीओही समोर आले आहेत. ज्यात एकाच वेळी 50 पेक्षा अधिक लोकांना हार्ट अटॅक आला आहे. कोरोना लॉकडाऊननंतर जवळपास दोन वर्षांनी कोरोना नियमातून मुक्तता मिळाली आणि लोक सण-उत्सव, पार्टीचा भरभरून आनंद घेऊ लागले आहेत. जसं भारतात गणेशोत्सव, दिवाळी सण उत्साहात साजरा करण्यात आला. तसंच इतर देशांतही त्यांचे कार्यक्रम आयोजित होत आहेत. दक्षिण कोरियातही अशीच आऊटडोर नो मास्क हॅलोविन पार्टी आयोजित करण्यात आली होती. त्यासाठी देशाची राजधानी सिऊलमध्ये लोकांची गर्दी झाली.

पार्टीदरम्यान एका छोट्या रस्त्यावरून पुढे जाताना चेंगराचेंगरी झाली. काही लोकांना श्वास घ्यायला त्रास होऊ लागली, त्यापैकी काही जणांना हार्ट अटॅकही आला.

संबंधित बातम्या

मीडिया रिपोर्टनुसार 50 पेक्षा अधिक नागरिकांना हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती आहे. तर शेकडोपेक्षा अधिक लोक जखमी झाले आहेत.

जाहिरात

राष्ट्रीय अग्निशमन संस्थेचे अधिकारी चोई चेओन सिक यांनी सांगितलं की, इटावोनमध्ये शनिवारी रात्री गर्दीत झालेल्या चेंगराचेंगरीत जवळपास 100 लोक जखमी झाली आहेत.

जाहिरात

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार इटावोनच्या रस्त्यावर लोकांना सीपीआर दिला दातो आहे. तर काही लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

जाहिरात

दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती यूं सुक येओल यांनी या घटनेची माहिती मिळताच  योंगसान-गु जिल्ह्यातील इटावोनमध्ये तात्काळ आपत्कालीन टीम पाठवण्याचे आदेश दिले आहेत. जखमींना त्वरित उपचार मिळायला हवेत आणि घटनास्थळाच्या सुरक्षेची तपासणी करण्याच्याही सूचना दिल्या आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या