बंगळुरू, 25 मे : एखाद्या अपशब्दामुळे कारवाई होऊ शकते हे आपल्याला माहितीच आहे. पण सॉरी हा शब्द या अपशब्दांमध्ये बसत नाही. उलट कुणाचीही माफी मागण्यासाठी म्हणून आपण सॉरी म्हणतो. पण आता हाच सॉरी शब्द लिहिणाऱ्याच्या शोधात सध्या पोलीस आहे. हा शब्द लिहिणं कुणाला तरी भारी पडणार आहे. सॉरी शब्द लिहिल्याने पोलीस का शोधत आहे, असं या शब्दात काय आहे, असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल नाही का? (Sorry painted in school). कर्नाटकच्या बंगळुरूतील पोलीस सध्या अशा व्यक्तीच्या शोधात आहे, जिने सॉरी हा शब्द लिहिला आहे. आता तुम्ही म्हणाल की सॉरी का शब्द बरेच लोक लिहितात, यात असं काय वाईट आहे किंवा सॉरी शब्द लिहिणं हा काही गुन्हा आहे का? तुमचं अगदी बरोबर आहे. पण बंगळुरूतील सॉरीचं हे प्रकरण थोडं वेगळं आहे. इथं एका खासगी शाळेच्या परिसरात सर्वत्र सॉरी शब्द लिहिण्यात आला आहे. किंबहुना तो रस्त्यावर, भिंतीवर पेंट करण्यात आला आहे. शाळेच्या आणि शाळेच्या आवारातील भिंती, शाळेच्या प्रवेशद्वाराजवळही पेंटने सॉरी लिहिण्यात आलं आहे. ज्याचे फोटो एनआयने ट्विट केले आहेत. हे वाचा - चमत्कार! तिसऱ्या मजल्यावरून कोसळली पण साधं खरचटलंही नाही; दीड वर्षांच्या चिमुकलीला पाहून डॉक्टरही हैराण सुनकदकट्टे परिसरातील हे दृश्य आहे. शाळेतल्या विद्यार्थ्यांनीच हा प्रताप केला असावा, असा संशय शाळा प्रशासनाला आहे. दरम्यान बंगळुरू पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सीसीटीव्ही फुटेजमध्ये बाईकवर दोन तरुण दिसत आहेत.
रिपोर्ट नुसार या तरुणांनी डिलीव्हरी बॉयसारखी एक मोठी बॅग घेतली आहे. या बॅगतून रंग काढून ते सगळीकडे सॉरी लिहिताना दिसत आहेत, असं सीसीटीव्ही फुटेजमधून दिसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आता पोलीस या तरुणांचा शोध घेत आहेत.