भगवान शिवशंभूवरती भारतातल्या जवळपास प्रत्येकाची श्रद्धा आहे. हा भोळा सांब सर्वांवर समानतेनं कृपादृष्टी करतो, असा सर्वांचा विश्वास आहे. शिवाय, भूत-प्रेतात्मे भगवान महादेवासमोर नतमस्तक असल्याकारणाने त्यांची बाधा होऊ नये, म्हणून शंकराची उपासना करणारेही भक्त आहेत. तर, या महादेवाच्या भारतातल्या एका प्राचीन मंदिराशी संबंधित आश्चर्यकारक गोष्टी (Amazing facts about Somnath temple) आपण जाणून घेणार आहोत.
काही दिवसांतच पावसाळा सुरू होणार असून शिवभक्तांची भगवान दर्शनासाठी गर्दी होणार आहे. भगवान शिवाच्या सर्व ज्योतिर्लिंगांमध्ये, सोमनाथ मंदिर हे अतिशय अद्वितीय आहे. तसंच, हे एक अतिशय भव्य मंदिर आहे, ज्याबद्दल लोकांना कमी माहिती आहे. आज आम्ही तुम्हाला भगवान शिवाच्या या प्राचीन मंदिराशी संबंधित आश्चर्यकारक गोष्टी सांगणार आहोत. (फोटो: Canva)
आजकाल तुम्ही मंदिरे पाडून मशीद बांधण्याच्या अनेक बातम्या ऐकल्या असतील. मुघल आणि त्यांच्या आधीच्या राज्यकर्त्यांनी अनेक मंदिरांवर हल्ले करून खूप नुकसान केल्याचंही तुम्ही ऐकलं असेल. सोमनाथ मंदिर हे देखील यापैकी एक आहे, जे 17 वेळा लुटले गेलं (सोमनाथ मंदिरावर गझनीच्या महमूदाने 17 वेळा हल्ला केला). हे मंदिर 1000 ते 1024 दरम्यान ओटोमन तुर्कांपैकी निर्दयी आणि हापापलेल्या गझनीच्या महमूदाने 17 वेळा लुटलं होतं. मंदिरातून जमा केलेले सर्व पैसे तो सोबत घेऊन जायचा. (फोटो: Canva)
नमस्ते इंडिया ट्रिप वेबसाइटनुसार, असं मानलं जातं की, या मंदिराचे मूळ शिवलिंग हवेत तरंगतं (floating shivling of Somnath temple). त्याच ठिकाणी दुसऱ्या शिवलिंगाची स्थापना करण्यात आली. (फोटो: Canva)
तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, सोमनाथ मंदिराचा उल्लेख स्कंद पुराण, ऋग्वेद, भगवद्गीता, शिवपुराण इत्यादींमध्ये आढळतो. यावरून हे मंदिर किती जुनं आहे, हे स्पष्ट होतं. असं मानलं जातं की, येथे शिवलिंगाची स्थापना भगवान चंद्राने केली होती, त्यामुळे याला सोमनाथ म्हटलं जातं. (फोटो: Canva)
मंदिराशी संबंधित सर्वात मनोरंजक गोष्ट म्हणजे त्यात स्थित असलेला बाण स्तंभ. हा स्तंभ मंदिराच्या आवारातच बसवला असून त्यावर संस्कृतमध्ये श्लोक लिहिलेला आहे. अबाधित ज्योतिमार्ग म्हणजे स्तंभ आणि समुद्राच्या पलीकडे दक्षिण ध्रुव यांच्यामध्ये जमिनीचा एक तुकडाही नाही. या स्तंभापासून ते अंटार्क्टिकापर्यंत अधे-मधे जमिनीचा थोडाही भाग नाही, असा याचा सोप्या शब्दात अर्थ आहे. (फोटो: Twitter/ranvijayT90)