मुंबई, 31 जानेवारी : फेसबुक असो, ट्विटर असो, इन्स्टाग्राम असो, व्हॉट्स असो किंवा इतर कोणताही सोशल मीडिया… जिथं आपण मनमोकळेपणाने सर्वांसमोर व्यक्त होतो, तिथंही काही बंधनं असतात. जर त्या मर्यादेचं उल्लंघन केलं तर कारवाईलाही सामोरं जावं लागतं. कुणाच्या भावना दुखावतील अशा, वादग्रस्त, तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट केल्याने सोशल मीडियावर बॅन केल्याची बरीच प्रकरणं तुम्हाला माहिती असतील. पण असं प्रकरण चर्चेत आहे, जे वाचूनच तुम्हाला आश्चर्य वाटेल. एका महिलेने बटाट्यावर कमेंट केली म्हणून तिचं सोशल मीडिया अडचणी आलं. ज्या फेसबुकवर तिने बटाट्यावर कमेंट केली होती, त्या फेसबुकने तिला बॅन केलं आहे. क्लेअर शार्प असं या महिलेचं नाव आहे. तिने स्वतःच याबाबत आपल्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केली आहे. यामागील नेमकं कारण समजलं तर तुम्ही हैराण व्हाल आणि तुम्हाला हसूही येईल. हे वाचा - Oh no! फक्त एक फोन कॉल आणि आता असा अर्धवट सूजलेला ओठ घेऊन फिरतेय ड्रामा क्वीन क्लेअरने सांगितलं की, फेसबुकवर तिने आपला एक फोटो पोस्ट केला होता. त्यामध्ये तिने बटाट्याचा उल्लेख केला होता. बटाट्याची तुलना तिने स्वतःशी केली होती. त्यानंतर फेसबुकने तिला एका महिन्यासाठी बॅन केलं.
याबाबत तिने फेसबुककडे विचारणा केली. त्यावेळी फेसबुकने तिला दिलेलं उत्तर शॉकिंग होतं. क्लेअर दुसऱ्या कुणाची चेष्टा करत आहे, खिल्ली उडवत आहे असं समजून फेसबुकने तिच्या अकाऊंटवर कारवाई केली. क्लेअरने याबाबत स्पष्टीकरण देताना सांगितलं की, तिने स्वतःच्या फोटोवर कमेंट केली होती. तिने जो ड्रेस घातला होता त्यामुळे ती बटाट्यासारखी दिसत होती. दुसऱ्या कुणाचा भावना दुखावण्याचा तिचा उद्देश नव्हता. असं ती म्हणाली. हे वाचा - तुमची GF, बायको दिवस-रात्र गुगलवर काय शोधते माहिती आहे? इथं पाहा तिची सर्च लिस्ट क्लेअरचं फेसबुक अकाऊंट फक्त एका महिन्यासाठी बॅन करण्यात आलं आहे, ब्लॉक नाही. क्लेअरने जी कमेंट केली ती तिच्याप्रमाणे तुम्हालाही ती तिचं अकाऊंट बॅन करण्याइतपत गंभीर वाटत नसावी तरी पण तरी या प्रकरणावरून तुम्हाला अगदी क्षुल्लक वाटणारी कमेंटही सोशल मीडियासाठी गंभीर असू शकते. त्यामुळे सोशल मीडियावर कोणतीही कमेंट करताना दहावेळा विचार करा. नाहीतर तुमचं सोशल मीडिया अकाऊंटही तात्पुरतं बॅन किंवा कायमचं ब्लॉक होईल.