JOIN US
मराठी बातम्या / Viral / वाऱ्यामुळे चालत्या गाडीवर कोसळला भला मोठा साइन बोर्ड; VIDEO VIRAL

वाऱ्यामुळे चालत्या गाडीवर कोसळला भला मोठा साइन बोर्ड; VIDEO VIRAL

ही दृश्य कॅमेऱ्यात कैद झालीत.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

अहमदाबाद, 03 जून : निसर्ग चक्रीवादळाचा (Nisarga cyclone) महाराष्ट्राच्या बहुतेक भागाला फटका बसला आहे. कुठे झाडं उन्मळून पडली, कुठे छप्पर उडाले, कुठे होर्डिंग्स कोसळले. यादरम्यान गुजरातमधील असा एक व्हिडिओ व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये एक भला मोठा साइन बोर्ड गाडीवर कोसळला आहे. ही दृश्यं कच्छमधील (Kutch) आहेत. ज्यामध्ये सोसाट्या वारा आणि पाऊस पडत असल्याचं दिसतं आहे आणि या वाऱ्यामुळे रस्त्यावरील साइन बोर्ड एका चालत्या गाडीवर पडताना दिसतो आहे. याच बोर्डजवळ जनावरं आणि इतर माणसंही उभी असताना दिसत आहेत.

संबंधित बातम्या

सुरुवातीला एक गाडी या साइन बोर्डच्या खालून गेली. त्यानंतर विरुद्ध दिशेनं दुसरी गाडी आली आणि गाडी साइन बोर्डखाली येताच हा बोर्ड पडला. गाडीच्या पुढील भागावर बोर्ड कोसळला आहे. त्यामुळे गाडीचालकाला दुखापत झाल्याची शक्यता आहे. बोर्डजवळील जनावरं आणि माणसं मात्र तिथून लगेच पळाल्याचं दिसतं आहे. महाराष्ट्रात निसर्ग चक्रीवादळाचे दोन बळी निसर्ग चक्रीवादळाने राज्यात दोन जणांचा बळी घेतला. निसर्ग चक्रीवादळाचा पहिला बळी अलिबागमध्ये गेला आहे. अलिबागमधल्या उमटे गावातल्या 58 वर्षांच्या दशरथ वाघमारे यांच्यावर विजेचा खांब पडल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. तर दुसरा मृत्यू पुणे जिल्ह्यात झाला. वाहागव येथील नवले कुटुंबाचं घर कोसळल्याने एका महिलेचा मृत्यू झाला आहे, तर  5 जण जखमी झालेत. हे वाचा-  निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यात राज्यात गेला 2 जणांचा बळी, कोट्यवधींचं नुकसान दरम्यान रात्री निसर्गचा जोर ओसरणार असून सकाळपर्यंत हे वादळ शांत होईल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या