JOIN US
मराठी बातम्या / Viral / चिडलेल्या हत्तीने थेट पिक-अप केला उलटा, Shocking Video पाहून नेटकरी अवाक्

चिडलेल्या हत्तीने थेट पिक-अप केला उलटा, Shocking Video पाहून नेटकरी अवाक्

अनेकजण पर्यटनासाठी विविध ठिकाणी जातात. वेगवेगळ्या ठिकाणचा आनंद लुटताना दिसतात. पर्यटनासाठी गेलेल्या लोकांचे अनेक फोटो व्हिडीओ सोशल मीडियावर फिरत असतात.

जाहिरात

व्हायरल

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 15 जानेवारी : अनेकजण पर्यटनासाठी विविध ठिकाणी जातात. वेगवेगळ्या ठिकाणचा आनंद लुटताना दिसतात. पर्यटनासाठी गेलेल्या लोकांचे अनेक फोटो व्हिडीओ सोशल मीडियावर फिरत असतात. काही व्हिडीओ तर इंटरनेटवर धुमाकूळ घालताना पहायला मिळतात. सोशल मीडियावर सतत नवनवे व्हिडिओ व्हायरल होत राहतात. यातील प्राण्यांच्या व्हिडिओला नेटकऱ्यांची विशेष पसंती मिळते. अनेकदा यात प्राण्यांची मजेशीर मस्ती पाहायला मिळते, बऱ्याचदा भावुक करणारे व्हिडिओही समोर येतात. मात्र, प्राण्यांच्या हल्ल्याचे व्हिडिओ अतिशय भयानक आणि थरकाप उडवणारे असतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये एक हत्ती चिडलेला पहायला मिळत आहे. हत्तीचा संताप पाहून तुम्हालाही धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. हा व्हायरल होत असलेला व्हिडीओ गुवाहाटीमधील असून तिथे हत्तीची चांगलीच दहशत पहायला मिळत आहे. व्हिडीओमध्ये दिसतंय की, गुवाहाटीच्या रस्त्यावर संतापलेला हत्ती पिक-अप ढकलत आहे. पिक-अप ढकलत ढकलत त्याने ती उलटीच करुन टाकली. एवढंच नाही तर हत्तीने ती पीक-अप ढकलूनही दिली. हत्तीचा हा रुद्र अवतार पाहून नेटकरीही अवाक् झाले आहेत.

संबंधित बातम्या

हत्तीच्या या चिडलेल्या अवताराचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हत्तीचा हा भयानक अवतार पाहून सगळेच थक्क झाले. हा व्हिडीओ इंटरनेटवर धुमाकूळ ही घालयोत. सोशल मीडियावर रोज वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल होत असतात. यापैकी काही व्हिडिओ मनोरंजक, तर काही माहितीपर असतात. याशिवाय काही व्हिडिओ आश्चर्यकारक गोष्टींवर आधारित असतात. सोशल मीडियावर पाळीव प्राण्यांशी संबंधित अनेक व्हिडिओ पाहायला मिळतात.

दरम्यान, काही सेंकंदाचा हा व्हिडीओ अनेकांचं लक्ष वेधत आहे. आतापर्यंत हजारो जणांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. काहींनी या व्हिडिओवर कमेंटही केल्या आहेत. हा व्हिडिओ पाहून यूजर्सनी आश्चर्य व्यक्त करत म्हटलं, की आपण त्यांच्या जंगलाची तोड केल्यानंच हे सगळं होत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या