JOIN US
मराठी बातम्या / Viral / शेजारचा छेडछाड करत होता म्हणून तरुणीने मारली छतावरुन उडी आणि...

शेजारचा छेडछाड करत होता म्हणून तरुणीने मारली छतावरुन उडी आणि...

पीडित मुलीने त्याला विरोध करण्याचा प्रयत्न केला; पण त्याचा मुकाबला करणं अशक्य असल्याचं दिसताच तिनं लाज वाचवण्यासाठी घराच्या छतावरून उडी मारली.

जाहिरात

प्रतिकात्मक फोटो

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 10 डिसेंबर : गेल्या काही वर्षांत तरुणींवर अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. तरुण मुलींची छेड काढणं, त्यांच्याशी असभ्य वर्तन करणं असे प्रकार सर्रास होताना दिसतात. उत्तर प्रदेशात अशाच प्रकारची एक घटना घडली आहे. घरात एकटी मुलगी असल्याचं पाहून एक जण घरात घुसला आणि त्याने तिचा विनयभंग केला. पीडित मुलीने त्याला विरोध करण्याचा प्रयत्न केला; पण त्याचा मुकाबला करणं अशक्य असल्याचं दिसताच तिनं लाज वाचवण्यासाठी घराच्या छतावरून उडी मारली. या घटनेत पीडित मुलगी गंभीर जखमी झाली आहे. पीडित मुलीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. उत्तर प्रदेशात रोडरोमिओंविरोधात कडक कारवाई होऊनही महिलांची छेडछाड, विनयभंगाच्या घटना कमी होत नसल्याचं चित्र आहे. झाशीतल्या कटेरा पोलीस स्टेशन क्षेत्रातल्या एका गावात एका व्यक्तीने घरात एकट्या असलेल्या मुलीची छेड काढून तिचा विनयभंग केला. हे ही वाचा : … आणि ते एका रात्रीत झाले करोडपती, एका अजब गावाची गजब गोष्ट   मुलीने त्याला सुरुवातीला खूप विरोध केला; पण त्याचं कृत्य सुरूच राहिल्याने अखेरीस त्या मुलीने आपली लाज वाचवण्यासाठी घराच्या छतावरून उडी मारली. या घटनेत पीडित मुलीचे हात-पाय मोडले आहेत. घटना घडताच शेजारी राहणाऱ्यांनी तिला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस रुग्णालयात पोहोचले. तिथे पीडितेच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “पीडित मुलीचे आई-वडील शेतात पिकांना पाणी देण्यासाठी गेले होते. त्यामुळे मुलगी घरी एकटीच त्यांच्यासाठी जेवण बनवत होती. दरम्यान, गावातला गोपाल यादव हा तरुण दारूच्या नशेत या मुलीच्या घरात घुसला आणि तिची छेड काढू लागला.” तरुणीचे स्टेटमेंट घेताना पोलीस

तरुणीचे स्टेटमेंट घेताना पोलीस

“मी सुरुवातीला गोपालला विरोध केला. एकदा धक्का दिला; पण मी त्याचा मुकाबला करू शकले नाही. आरोपी माझ्यावर अत्याचार करू इच्छित होता. त्यामुळे मी माझी लाज वाचवण्यासाठी घराच्या छतावर गेले. आरोपी गोपाल माझ्या मागे छतावर पोहोचला. हे पाहून मी छतावरून खाली उडी मारली,” असं पीडित मुलीने सांगितलं आहे. “आरोपी गोपाल यादव बऱ्याच दिवसांपासून आमच्या मुलीचा पाठलाग करत होता. यापूर्वीदेखील त्याने आमच्या मुलीची छेड काढली आहे. आरोपीच्या या कृत्यांमुळे आम्ही आमच्या मुलीला शाळेत पाठवणं बंद केलं होतं,” असं पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी पोलिसांना चौकशीदरम्यान सांगितलं. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचलेल्या मौरानीपूरच्या पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं, “या प्रकरणी मुलीच्या कुटुंबीयांनी तक्रार दिली आहे. या तक्रारीची दखल घेऊन योग्य ती कारवाई केली जात आहे.’’ दरम्यान, पीडित मुलीला झाशीतल्या मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आलं आहे. दुमजली घराच्या छतावरून उडी टाकल्याने ती गंभीर जखमी झाली आहे. तिचे हात आणि पाय फ्रॅक्चर झाले आहेत. याशिवाय शरीराच्या अन्य अवयवांना गंभीर जखमा झाल्या आहेत.

“पीडित मुलीची प्रकृती आता धोक्याबाहेर आहे; पण ती पूर्णपणे बरी होईपर्यंत तिला डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवावं लागेल,” असं डॉक्टरांनी सांगितलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या