लग्न
नवी दिल्ली, 6 फेब्रुवारी : लग्न हे एक पवित्र बंधन मानलं जातं. लग्नातील कार्यक्रम खास बनवण्यासाठी नवरदेव आणि नवरी दोन्ही कुटुंबातील व्यक्ती मेहनत घेत असतात. बऱ्याच लग्नातील फोटो व्हिडीओ सोशल मीडियावर फिरत असतात. लग्नातील अनेक मेजशीर आणि धक्कादायक घटना सोशल मीडियावर लक्ष वेधत असतात. अशातच लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच नवरीचं आयुष्य संपल्याची घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी वधूचा मृत्यू झाला. एका दिवसासाठी वधू बनून या मुलीने या जगाचा निरोप घेतला आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी नवविवाहित महिला सासरच्या घरी आंघोळीसाठी गेली असता बाथरूममध्ये गॅस लिकेज झाल्याने वधूचा गुदमरून मृत्यू झाला. मुलाच्या लग्नाबाबत अजूनही आनंदाची रेलचेल सुरू होती, मात्र वधूच्या आकस्मिक निधनाने त्याचे रूपांतर शोकात झाले. हेही वाचा - 3 असे देश जिथे Valentine’s Day साजरा केला जात नाही, पाहा नक्की काय आहे कारण? वधू सकाळी आंघोळ करण्यासाठी बाथरूममध्ये गेली. 15 मिनिटे ती बाहेर न आल्याने सासूने बाहेरून बाथरूमचा दरवाजा ठोठावला. आवाज न आल्याने त्यांनी तत्काळ कुटुंबातील इतर सदस्यांना याबाबत माहिती दिली. सुमारे 20 मिनिटांनी सर्वांनी मिळून दरवाजा तोडला. आत गेल्यावर नववधू एका कोपऱ्यात बेशुद्ध अवस्थेत पडलेली दिसली. घाईघाईत गाडी दवाखान्यात नेली. जिथे डॉक्टरांनी मृत घोषित केले. वधूच्या सासरच्या मंडळींकडून कोणीही पोलिसांत तक्रार केलेली नाही. जागृती विहार सेक्टर-8 मध्ये राहणारे पारस कुमार हे इंजिनिअर आहेत. त्याचे वडील लष्करातून निवृत्त झाले आहेत. पारसचा विवाह गाझियाबादमधील वैशालीसोबत 2 दिवसांपूर्वी म्हणजेच 26 जानेवारीला झाला होता. गुरुवारी विवाहसोहळा पार पडला. शुक्रवारी वधूचे दर्शन घेतल्यानंतर तिला घरी आणण्यात आले. शनिवारी घरी भजन संध्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर नववधू बाथरूममध्ये आंघोळीसाठी गेली. बराच वेळ आंघोळ करून वधू बाहेर न आल्याने घरातील सर्वजण काळजीत पडले. घरच्या बायका वैशालीची वाट पाहत होत्या मात्र नववधूने दुसऱ्याच दिवशी जगाचा निरोप घेतला.
रुग्णालयातून कुटुंबीय मृतदेह घेऊन घरी आले आणि सुनेच्या मृत्यूची माहिती पालकांना दिली. वैशालीचे नातेवाईकही मेरठला पोहोचले. येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पारसच्या भावाने सांगितले की, गॅस गिझरमधून गॅस गळतीमुळे हा मृत्यू झाला. कुटुंबीयांनी त्यांच्या संमतीने अंत्यसंस्कार केले.