लग्नानंतर महिला सिंदूर का लावतात?

लग्नाच्या प्रत्येक विधीचे काहीतरी विशेष, खास कारण असते. 

यातीलच एक खास विधी म्हणजे महिलांच्या भांगेत कुंकू, सिंदूर लावतात. 

लग्नानंतर महिला सिंदूर का लावतात यामागे धार्मिक आणि वैज्ञानिक कारण आहे.

विवाहित आणि भाग्यवान असल्याचा सर्वात मोठा पुरावा म्हणजे भांगेत लावला जाणारा सिंदूर.

सिंदूर विवाहिताचे निशाणी असल्यामुळे अविवाहित मुली हे लावू शकत नाही.

हिंदू धर्मात सिंदूर लावण्याची परंपरा फार जुनी आहे. 

सिंदूर लावल्यामुळे नवऱ्यासोबतचं नातं दृढ होतं आणि नवऱ्याचं आयुष्य वाढतं असं मानलं जातं.

वैज्ञानिक दृष्टीकोनातून महिलांनी सिंदूर लावणे शरीराशी संबंधीत आहे. 

 सिंदूरमध्ये बुध धातू आढळतो, जो ब्रह्मरंध्र ग्रंथीसाठी अत्यंत प्रभावी धातू मानला जातो.