व्हायरल व्हिडीओ
मुंबई १४ नोव्हेबर : सोशल मीडियावर व्हिडीओची कमी नाही. एकदा का तुम्ही तेथे गेलात की तुम्हाला तेथे तुमच्या आवडीचे इतके व्हिडीओ दिसतील की ते पाहाण्यात तुमचा वेळ कसा निघून जाईल हे तुमचं तुम्हाला कळणार नाही. येथे तुम्हाला मनोरंजक तसेच माहिती संदर्भात देखील अनेक व्हिडीओ पाहायला मिळतील. शिवाय येथे आपल्याला अशा काही घटनांचे व्हिडीओ देखील पाहायला मिळतात. ज्यांच्या वर विश्वास ठेवणं कठीण आहे. सध्या एक असाच व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे. जो पाहून तुम्हाला धक्का बसेल. हा एका अपघाताचा व्हिडीओ आहे. यामध्ये जे घडलं त्यावर तुमचा विश्वास देखील बसणार नाही. हे ही पाहा : Viral : मालगाडी खाली अडकली व्यक्ती, जीवन मरणाचा संघर्ष व्हिडीओत कैद या अपघाताचा व्हायरल व्हिडीओ एका लहान मुलगी आहे. ती सायकल चालवत असताना कार चालक तिला पाहत नाही आणि तिलाच्यावरुन गाडी नेतो. हे खूपच भयानक आहे. पण या मुलीचं नशीब इतकं चांगलं आहे की गाडी तिच्या अंगावरुन जाऊन देखील तिचे प्राण वाचले आहेत. हे कसं शक्य आहे? गाडी अंगावरुन जाऊन देखील ही चिमुकली कशी वाचली असा प्रश्न तुम्हाला पडलाच असणार. मग हा व्हिडीओ नक्की पाहा. व्हिडीओच्या सुरुवातीला चिमुकली सायकल चालवताना दिसते आणि ती सायकल चालवत रस्त्यावर येते. तेव्हा समोरुन एक कार जात असते. पण ती चिमुकली कार चालकाला दिसत नाही आणि तो सरळ तिला धडकतो. इतकंच नाही तर तो कार या चिमुकली वरुन नेतो.
हा क्षण अंगावर काटा आणणारा असला तरी नशीबानं या मुलीला काहीही झालेलं नाहीय खरंतर याला चमत्कारच म्हणावं लागेल. कारण चक्क गाडी अंगावरुन जाऊन देखील ती चिमुकली उठून उभी राहिली आणि तेथून पळून जाऊ लागली. हे ही पाहा : नशीब म्हणतात ते हेच का? भरधाव कार येताच… हृदयाचे ठोके चुकवणारा अपघात कॅमेरात कैद हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना देखील आश्चर्य वाटलं आहे. हा व्हिडीओ Dipanshu Kabra यांनी आपल्या ट्वीट अकाउटवरुन शेअर केला आहे. लोकांनी यावर कमेंट केल्या आहेत. तर अनेकांनी त्याला शेअर देखील केलं आहे. खरंतर यामध्ये मुलगी आणि कारचालक दोघांची देखील चुकी आहे. रस्त्यावर त्यांनी सावधगीरी बाळगण्याची गरज होती, जी त्यांनी पाळली नाही. ज्यामुळे हा अपघात घडला. खरंतर पालकांनी देखील त्यांच्या मुलांना असं एकट्यांना रस्त्यावर सोडू नये. या चिमुकलीचं नशीब चांगलं होतं. पण प्रत्येकाचं नशीब इतकं चांगलं असेलच असं नाही.