JOIN US
मराठी बातम्या / Viral / VIDEO : भाजीविक्रेत्याचं किळसवाणं कृत्य, भाजीवर लघवी करुन विकत होता भाजी, अखेर असं समोर आलं सत्य

VIDEO : भाजीविक्रेत्याचं किळसवाणं कृत्य, भाजीवर लघवी करुन विकत होता भाजी, अखेर असं समोर आलं सत्य

एक अशी बातमी सोशल मीडियावर समोर आली आहे, जी ऐकून तुमच्या पायाखालची जमीनच सरकेल. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

लखनऊ 17 सप्टेंबर : चांगला आहार आपल्या आरोग्यासाठी फारच चांगलं असल्याचं म्हटलं जातं. ज्यामुळे आपली शरीरिक आणि मानसिक स्थिती चांगली राहाते. ज्यामुळे आपण फळभाज्या, हिरव्या भाज्या, तसेच फळं खातो. परंतू ज्या गोष्टी आपण पौष्टीक म्हणून खातो. त्यामुळेच जर आपल्या शरिराला धोका वाढला तर? एक अशी बातमी सोशल मीडियावर समोर आली आहे, जी ऐकून तुमच्या पायाखालची जमीनच सरकेल. कारण या व्यक्तीनं जे केलं ते तुमच्या आमच्या सगळ्यांच्या आयुष्याशी निगडीत आहे. उत्तर प्रदेशातील बरेली येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रत्यक्षात भाजी विक्रीत्याने भाजीवर लघवी केली. ऐकून तुम्हाला धक्का बसला असेल, परंतू हे खरं आहे. या भाजी विक्रेत्याला येथील स्थानीक लोकांनी पकडले. लोकांनी त्या व्यक्तीचा व्हिडीओ बनवला, जो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून लोकांनी या व्यक्तीवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लोकांनी जेव्हा त्या व्यक्तीला विचारले तेव्हा त्याने आधी बहाणा केला, पण नंतर आपली चूक मान्य केली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना बरेलीच्या जनकपुरी भागातील आहे. शरीफ असे आरोपी भाजी विक्रेत्याचे नाव आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हिंदू जागरण मंचच्या कार्यकर्त्यांनी त्याचा निषेध केला. हे वाच : शाळकरी मुलाच्या चंद्रानं अख्ख्या महाराष्ट्राला लावलंय वेड, सुर असा की अंगावर येईल शहारा, पाहा Video सध्या पोलिसांनी आरोपी शरीफला पकडले आहे आणि त्याच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 153A, 295, 269 आणि 270 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपी शरीफविरुद्ध प्रेम नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या

विशेष म्हणजे बरेलीमध्ये भाजी विक्रेते शरीफ यांनी भाजीवर लघवी केल्याची घटना लोकांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केली आणि त्यानंतर सक्रियता दाखवत ती सोशल मीडियावर व्हायरल केली. यानंतर हिंदू जागरण मंचचे महानगर अध्यक्ष दुर्गेशकुमार गुप्ता यांनी या घटनेची माहिती पोलिस स्टेशन प्रेमनगरला दिली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक करून पोलीस ठाण्यात नेले. हे वाच : आईनेच केला पोटच्या मुलांच्या जीवाशी खेळ, कॅमेऱ्यात कैद झालं धक्कादायक दृश्य; VIDEO VIRAL यादरम्यान हिंदू जागरण मंचचे सर्व कार्यकर्ते पोलिस ठाण्याजवळ जमा झाले. त्यानंतर घटनेचे गांभीर्य समजून आरोपीकडून संपूर्ण माहिती घेण्यात आली. आरोपीने आपला गुन्हाही कबूल केला. एवढेच नाही तर आरोपी भाजी विक्रेत्याने कॅमेऱ्याला कान धरून माफीही मागितली. त्याचवेळी समाजात द्वेष निर्माण करण्याचा हा सुनियोजित षडयंत्र असल्याचा आरोप हिंदू जागरण मंचाने केला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या