नवी दिल्ली, 23 मे : प्रत्येकाच्या आनंदाच्या संकल्पना वेगवेगळ्या असतात. कोणाकडे कोट्यवधी संपत्ती असूनही ते आनंदी नसतात तर काही अवघ्या काही रुपयांमध्येच जगाचा आनंद मिळवतात. खरं पाहता, आयुष्यातील छोट्या छोट्या गोष्टी आपलं आयुष्य अधिक आनंदी करण्याचं काम करीत असतात. अनेकदा आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. छत्तीसगड केडरचे आयएएस अधिकारी अवनीश शरण सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. ते अनेकदा प्रेरणादायी आणि मनोरंजक व्हिडिओ आणि फोटो पोस्ट करतात. यंदाही त्यांनी असाच एक व्हिडिओ शेअऱ (Viral Video) केला आहे. या व्हिडीओमध्ये वडील आणि त्यांची मुलगा आनंदाने वेडे झाले आहेत. त्यांच्या आनंदाच्या क्षणाविषयी जेव्हा तुम्हाला कळेल तर तुम्हीही भावुक व्हाल. यावेळी अवनीश शरण यांनी व्हिडीओ शेअर करताना लिहिलं की, ही केवळ सेकंड हँड सायकल आहे. मात्र त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद तर पाहा. त्यांच्या चेहऱ्यावरुन असं वाटतं की, त्यांनी मर्सिडीज खरेदी केली आहे. एका बापाने कोट्यवधींची मर्सिडीज खरेदी केली नाही तर काही शे रुपयांची सेकंड हँड सायकल खरेदी केली होती. मात्र त्याच्या आणि मुलाच्या चेहऱ्यावरील आनंद हा पैशात मोजता येणार नाही. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद, सुख याची कशाचीही तुलना करता येणार नाही. मुलगा तर आनंदात उड्याच मारत आहे.
काही व्हिडीओ..काही फोटो हे तुम्हाला जगण्यातील सकारात्मकता इतक्या प्रखऱपणे दाखवितात, की स्वत:चे प्रश्न तुम्हाला लहान वाटायला लागतात. असे व्हिडीओ तुम्हाला त्या संकटाशी लढण्याचं बळ मिळवून देतात. सोशल मीडियावर अनेकांनी या व्हिडीओचं कौतुक केलं आहे. शेकडो जणांनी यावर प्रतिक्रियाही दिल्या आहेत.