JOIN US
मराठी बातम्या / Viral / VIDEO: कसं शक्य आहे? पाण्यात बुडवलं, त्यावरून कारही चालवली; 'या' स्मार्टफोनला काहीच झालं नाही

VIDEO: कसं शक्य आहे? पाण्यात बुडवलं, त्यावरून कारही चालवली; 'या' स्मार्टफोनला काहीच झालं नाही

एखादा स्मार्टफोन (Smartphone damaged) पाण्यात बुडल्यास किंवा त्यावरून गाडी चालवल्यानंतरही तो आहे तसाच राहिल्याचं तुम्ही ऐकलं आहे का? तुम्ही म्हणाल हे शक्य नाही. मात्र, सॅमसंग गॅलेक्सी S22 अल्ट्रा (Samsung Galaxy S22 Ultra) या स्मार्टफोननं हे शक्य करून दाखवलं आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 20 फेब्रुवारी: एखादा स्मार्टफोन (Smartphone damaged) पाण्यात बुडल्यास किंवा त्यावरून गाडी चालवल्यानंतरही तो आहे तसाच राहिल्याचं तुम्ही ऐकलं आहे का? तुम्ही म्हणाल हे शक्य नाही. मात्र, सॅमसंग गॅलेक्सी S22 अल्ट्रा (Samsung Galaxy S22 Ultra) या स्मार्टफोननं हे शक्य करून दाखवलं आहे. पीबीके रिव्ह्युज (PBKReviews) या युट्युब चॅनेलवर (YouTube) याबाबत एक व्हिडीओ अपलोड करण्यात आला आहे. सॅमसंग गॅलेक्सी S22 अल्ट्रा किती बळकट आहे हे, या व्हिडीओतून दिसत आहे. या व्हिडीओमध्ये या फोनची अत्यंत कठीण चाचणी घेण्यात आली आहे. पीबीके रिव्‍ह्युजनं, सॅमसंग गॅलेक्‍सी एस22 अल्‍ट्राला ड्युरेबिलिटीसाठी 10 पैकी 9.5 (Galaxy S22 Ultra Durability Rating) रेटिंग दिलं आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या अशाच प्रकारच्या एका टेस्टमध्ये सॅमसंगच्या व्हॅनिला गॅलेक्‍सी S22 मॉडेलला (vanilla Galaxy S22 model) 10 पैकी10 रेटिंग देण्यात आलं होतं. सॅमसंग गॅलेक्‍सी S22 अल्‍ट्रा मजबूत तर आहेच याशिवाय त्यामध्ये अनेक दमदार फीचर्सही (Samsung Galaxy S22 Ultra Featurs) आहेत. हे वाचा- iPhone 13 च्या नावे Online Fraud, Instagram वर अनेक युजर्स स्कॅमर्सच्या जाळ्यात सॅमसंग गॅलेक्सी S22 अल्ट्रा हा स्मार्टफोन, गॅलेक्सी S22+ स्मार्टफोन (Samsung Galaxy S22+ Smartphone) आणि गॅलेक्सी टॅब S8 सीरीजच्या (Galaxy Tab S8 Series) सोबत 9 फेब्रुवारी रोजी लाँच करण्यात आला. गॅलेक्सी S22 सीरिजमधील स्‍मार्टफोन आर्मर अॅल्‍युमिनियम (Armor Aluminum) आणि गोरिल्ला ग्‍लास व्हॅक्‍टसनं + (Gorilla Glass Vacts+) प्रोटेक्टेड असल्याचं लाँचदरम्यान सांगण्यात आलं होतं. गॅलेक्सी S22 अल्ट्राच्या मागील व पुढील अशा दोन्ही बाजूंनी हे सेफ्टी फीचर्स देण्यात आले आहेत. सॅमसंग गॅलेक्सी S22 अल्ट्रानं पार केल्या ‘या’ टेस्ट >> वॉटर टेस्‍ट : सॅमसंग गॅलेक्सी S22 अल्ट्राची (Samsung Galaxy S22 Ultra dust and water resistance) वॉटर रेझिस्टन्सी तपासण्यासाठी तो पाण्यात (Water Test) बुडवण्यात आला होता. त्यावर पाण्याचा कोणताही दुष्परिणाम झाला नाही. कारण, त्याला वॉटर आणि डस्ट रेझिसटन्सीसाठी I68 रेटिंग मिळालेलं आहे हे वाचा- दुसऱ्यांनी बनवलेल्या व्हिडीओद्वारे YouTubeवर लाखो कमावतात लोक,पाहा काय आहे ट्रिक » स्‍क्रॅच टेस्‍ट : यानंतर सॅमसंग गॅलेक्सी S22 अल्ट्राची स्क्रॅच टेस्ट (Scratch Test) घेण्यात आली. त्यावर स्क्रॅच करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागली. व्हिडिओत दाखवल्यानुसार, फोनच्या फिंगरप्रिंट एरियावर (Fingerprint Area) स्क्रॅचिंग असूनही, त्याच्या सेन्सरवर कोणताही दुष्परिणाम झाला नाही. या स्मार्टफोनची साईड बॉडी मेटलची आहे तर, अँटेना एरिया प्लास्टिकनं कव्हर केलेला आहे.

>> बेंड टेस्‍ट : व्हिडिओमध्ये दाखवण्यात आलं आहे की, गॅलेक्सी S22 अल्ट्राची बेंड टेस्ट (Bend Test) देखील घेण्यात आली आहे. जर एखाद्या टाईट पॉकेटमध्ये फोन ठेवल्यास काय होईल, हे तपासून पाहण्यासाठी ही बेंड टेस्ट करण्यात आली. या टेस्टमध्ये फोन यशस्वी झाला आहे. » फोनवरून नेण्यात आली कार : सॅमसंग गॅलेक्सी S22 अल्ट्राची सर्वात कठीण चाचणी कारच्या (Car Test) माध्यमातून घेण्यात आली. फोनवरून एक कार चालवण्यात आली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, कार ओलांडून गेल्यानंतरही फोनमध्ये काहीही बिघाड झाला नाही. काही किरकोळ ओरखडे वगळता, त्याच्या स्क्रीनवर कोणताही परिणाम झाला नाही. जर तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि तुमचा वापर रफ अँड टफ असेल तर सॅमसंगचा हा गॅलेक्सी S22 अल्ट्रा चांगला पर्याय ठरू शकतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या