JOIN US
मराठी बातम्या / Viral / नक्की चूक कोणाची? सहा सेकंदांचा Video पाहून उडेल थरकाप

नक्की चूक कोणाची? सहा सेकंदांचा Video पाहून उडेल थरकाप

काही अपघात प्राणघातक असतात तर काहींमुळे गंभीर दुखापत होते. सोशल मीडियावरही तुम्ही असे अनेक व्हिडिओ पाहिले असतील.

जाहिरात

व्हिडीओ व्हायरल

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 2 नोव्हेंबर : ‘संकटं कधी पूर्वकल्पना देऊन येत नाहीत’, हे वाक्य तुम्ही अनेकदा ऐकलं असेल. रस्ते अपघाताच्याबाबतीत हे वाक्य तंतोतंत खरं ठरतं. कारण रस्त्यावर कधीही अचानक अपघात होण्याची शक्यता असते. बहुतेक वेळा स्वत:च्या किंवा कधी-कधी समोरच्या व्यक्तीच्या बेजाबदारपणामुळे अपघात होतात. रस्त्यावर गाडी चालवताना किंवा पायी रस्ता ओलांडताना खूप काळजी घेणं आवश्यक आहे. कारण, कधी कुठून एखादी गाडी येऊन आपल्याला धडकेल हे सांगता येत नाही. सावध न राहिल्यास, कधीही, कुठेही अपघात घडतात. काही अपघात प्राणघातक असतात तर काहींमुळे गंभीर दुखापत होते. सोशल मीडिया वरही तुम्ही असे अनेक व्हिडिओ पाहिले असतील, ज्यामध्ये लोक काही सेंकदात अपघाताचे बळी ठरतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक महिला स्वतःच्या चुकीमुळे एका भीषण अपघाताची बळी ठरत असल्याचं दिसत आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर @OTerrifying नावाच्या आयडीवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. रिकामा रस्ता पाहून एक महिला झेब्रा क्रॉसिंगवरून रस्ता ओलांडत असल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत आहे. दरम्यान, एक बाइक अतिशय वेगानं आपल्या दिशेनं येत असल्याचं त्या महिलेलं दिसतं. ते पाहून ती अचानक रस्त्यातच थांबते. बाइक आपल्या मागील किंवा पुढील बाजूने जाईल, असा विचार तिने केला असावा. पण, तसं होत नाही. रस्त्यावर अचानक उभ्या असलेल्या महिलेला पाहून दुचाकीस्वार गोंधळून जातो आणि सरळ जाऊन तिला जोरदार धडक देतो, असं व्हिडिओमध्ये दिसत आहे.

संबंधित बातम्या

या अपघातातील महिलेची प्रकृती किती गंभीर आहे, याबाबत आता कोणतीही माहिती मिळालेली नाही. मात्र, व्हिडिओ पाहून हा अपघात खूपच गंभीर असल्याचं दिसत आहे. या अपघातात महिलेसोबतच दुचाकीस्वाराचीही चूक आहे, असं म्हणता येईल.

‘ती तिथे का उभी होती?’ या कॅप्शनसह पोस्ट केलेला हा सहा सेकंदांचा व्हिडीओ आतापर्यंत सात मिलियन म्हणजेच 70 लाखांपेक्षा जास्त नेटिझन्सनी बघितला आहे. चार हजारांहून अधिक जणांनी तो लाइकही केला आहे. हा व्हिडिओ पाहून नेटिझन्सनी वेगवेगळ्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. ‘हा कसा दुचाकीस्वार आहे, त्यानं ब्रेकच नाही लावला’ अशी एक कमेंट आली आहे. तर काहीजण, दुचाकीस्वार आणि बाई दोघांनाही मूर्ख म्हणत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या