पत्यांमध्ये एक्का मोठा का असतो? यामागील कारण फारच रंजक

पत्त्यांमध्ये 52 कार्ड असतात, यासोबत वेगवेगळ्या प्रकारचे गेम खेळले जातात

या कार्डमध्ये काही साधे पत्ते तसेच राजा, राणी, गुलाम आणि एक्का असतो, यामध्ये एक्का सर्वात मोठा आहे

पण तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का की, राजापेक्षा एक्का वरचढ का किंवा त्याला इतकं महत्व का?

अनेक कथा-पुराणामध्ये राजा-राणी नेहमीच वरचढ आहेत आणि त्यांनाच जास्त मान दिला जातो. मग पत्यांच्या जगात त्यांच्या वरचढ एक्का कसा?

एक्क्याचा संबंध युरोपियन देश फ्रान्समधील 1789 च्या फ्रेंच क्रांतीशी आहे

पत्त्यांचा इतिहासकार, सॅम्युअल सिंगर यांच्या मते, पत्ते खेळणे तत्कालीन फ्रेंच समाजाची सामाजिक स्थिती दर्शवते

पत्त्यांमध्ये चार प्रकारची पत्ते असतात. त्यात बदाम, चौकट, किलवर आणि इस्पिकची पान असतात

इस्पीक हे राजेशाहीचे प्रतीक मानले जाते, जे सम्राट-बेगमशी संबंधित आहे. बदामच्या पत्यांचा धर्मगुरूंशी संबंधित आहे

चौकटाचा संबंध व्यापाऱ्यांशी आणि किलवरचा संबंध शेतकरी आणि मजुरांशी आहे

फ्रेंच राज्यक्रांतीनंतर राजेशाही गेली आणि त्यामुळेच एक्का हा सर्वोच्च कार्ड बनला

सामान्य जनता, शेतकरी, कामगार यांनी राजेशाही कशी उलथून टाकली हे यातून दिसून येते. ज्यामुळेच एक्क्याला राजा-राणीपेक्षा ही जास्त महत्व आहे

एक्का हा इतर पत्यांमधील सामान्य लोक आणि क्रांतिकारकांचे प्रतीक आहे, म्हणून तो राजा आणि राणीपेक्षा मोठा आहे