10 Year Old Gets Treated To 3 Crore Lamborghini : मोम्फा जूनियर (Mompha Junior) नावाच्या 10 वर्षांच्या मुलाचं जबरदस्त नशीब आहे. जी संपत्ती मिळवण्यासाठी लोक आयुष्य खर्च करतात, ती संपत्ती वारसा म्हणून घेऊन हा मुलगा जन्माला आला आहे. मोम्फासाठी नेहमी रांगेत उभ्या असलेल्या आलिशान कारचं लोक स्वप्न पाहतात. जेव्हा या मुलाचा 10 वा वाढदिवस आला, तेव्हा त्याच्या वडिलांनी त्याच्या कारच्या ताफ्यात आणखी एक चमकणारी लॅम्बोर्गिनी आणली. वडिलांनी सांगितलं की, मुलाच्या बुटाच्या लेसशी जुळणारी लॅम्बोर्गिनी अॅव्हेंटाडोर (Lamborghini Aventador) त्याला भेट म्हणून देण्यात आली आहे.
वाढदिवस प्रत्येकासाठी खास असतो, पण आफ्रिकेतल्या मोम्फा ज्युनियरसारखं सर्वांचं नशीब नसतं. वयाच्या 10 व्या वर्षी कोणाला लक्झरी सुपरकार भेट दिली जाते? खेळण्यातली गाडी मिळाली तरी मुलं खूश होतात. मोहम्मद अवल मुस्तफा नावाच्या या मुलाला त्याच्या अब्जाधीश वडिलांकडून आलिशान कार भेट मिळाली.
स्वत: इस्मालिया मुस्तफा नावाच्या आफ्रिकन अब्जाधीशाने सोशल मीडियावर आपल्या मुलाचा फोटो शेअर केला आहे. 2 कोटी 84 लाखांहून अधिक किमतीच्या एका चमकणाऱ्या सुपरकारचा फोटो त्यांनी पोस्ट केला आहे, त्याच्या समोर चमकदार पिवळ्या लेसच्या शूजमध्ये हा मुलगा उभा आहे. त्यांनी लिहिलं की, मुलाच्या बुटाच्या फीतीशी जुळणाऱ्या पिवळ्या रंगाची लॅम्बोर्गिनी त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याला गिफ्ट केली आहे.
वडील आणि मुलाच्या सोशल मीडिया अकाउंटवर लाखो लोक त्यांना फॉलो करतात. वडिलांनी 1.2 दशलक्ष फॉलोअर्सना त्यांच्या मुलाच्या वाढदिवसाची आणि भेटवस्तूंची माहिती दिली. चाहत्यांनीही मुलाचं अभिनंदन केलं आणि सांगितलं की छोट्या अब्जाधीशाचं नशीब जबरदस्त आहे. मुलानेही आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून आपल्या श्रीमंतीचं प्रदर्शन केलं आहे.
मोम्फा ज्युनियरची ही पहिली कार नाही. त्याच्याकडे कारची संपूर्ण फौज तयार आहे, ज्याला तो प्राणीसंग्रहालय म्हणतो. तिचे वडील इस्मालिया मुस्तफा हे लागोस बेटातील मोम्फा ब्युरिया डी चेंजचे सीईओ आहेत आणि ते खूप श्रीमंत आहेत. त्यांनी ही श्रीमंती सोशल मीडियावर दाखवली आणि मुलानेही वडिलांचा हा छंद जोपासला आहे.
इस्लामिया मुस्तफा यांना त्यांचं आलिशान घर, खाजगी जेट आणि सुपरकार्स लोकांसमोर दाखवायला आवडतं. नायजेरिया आणि दुबईमध्ये त्यांच्या अनेक मालमत्ता आहेत. लहान वयातही मुलाच्या सोशल मीडिया अकाउंटवर श्रीमंत आयुष्याचे सर्व फंडे दिसून येतात.
मोम्फा ज्युनियरच्या अकाऊंटवर महागडे कपडे आणि महागड्या वस्तूंचं जणू काही एक दुकानच सजलेलं आहे. त्याचे वडील सांगतात की मोम्फा ज्युनियरचं स्वतःचं घर आहे आणि तो महागडे ब्रँडेड कपडेच वापरतो. हा मुलगा आफ्रिकेतील सर्वात श्रीमंत लहान मुलगा मानला जातो. तो मोठ्या ऐश्वर्यात जीवन जगत आहे. (सर्व फोटो क्रेडिट- Instagram/@mompha)