झेजियांग, 28 जुलै : सध्या सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ मोठ्या वेगाने व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये खड्ड्यात अडकलेल्या एका मुलाचा फक्त हात दिसत आहेत. या मुलाचा हात पकडून त्याला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ चीनचा असून, एका गुहेत अडकलेल्या सात वर्षाच्या मुलाला बाहेर काढण्यासाठी बचाव कार्य सुरू होते. याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. स्थानिक अग्निशमन दलाच्या म्हणण्यानुसार, चीनच्या झेजियांग प्रांतातील योंगझिया काउंटी येथे 22 जुलै रोजी ही घटना घडली. हा सात वर्षीय मुलगा आपल्या आजोबांसोबत नदीत पोहण्यासाठी गेला होता. मात्र अचानक हा मुलगा दिसेनासा झाल्याचे आजोबांनी सांगितले. आजोबा नातवाचा शोध घेत असताना, अचानक गावकऱ्यांना जमिनीतील एका छोट्या खड्ड्यातून बाहेर येणारा हात दिसला. एक मुलगा खड्ड्यात अडकल्याचे कळताच गावकऱ्यांनी तातडीनं स्थानिक अग्निशमन दलाला बोलावलं. वाचा- लोकांपासून इतका लांब जाऊन बसला की इंटरनेटवर VIDEO भन्नाट व्हायरल वाचा- सत्ता कोणाचीही असो आवाज मात्र आपलाच; सिंहिणीच्या डरकाळीने सिंह झाला गर्भगळीत पूर्व चीनच्या झेजियांग प्रांतात स्थानिक अग्निशमन दलाने दहा मिनिटांपेक्षा कमी वेळात या मुलाला खड्डयातून बाहरे काढले. अग्निशमन दलाच्या जवानांनी खड्डा खोदण्यास सुरुवात केली, त्यानंतर अधिकाऱ्यांनी पोस्ट केलेल्या केलेल्या फुटेजमध्ये हाताला धरून मुलाला बाहेर काढताना दिसत आहेत. वाचा- फुटबॉल, लुंगी आणि सराव! तरुणांचा जबरदस्त VIDEO पाहून तुम्हीही म्हणाल;‘एक नंबर’ स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले की, जमिनीखाली अशी गुहा हे कोणाला माहित नव्हते. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार असे अपघात पुन्हा होऊ नये म्हणून ही गुहा बुजवण्यात येणार आहे.