JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / Viral / कमाल झाली; नॅशनल हायवेवरील खड्डे पाहून 'परम सुंदरीं'नी केला चक्क Ramp walk

कमाल झाली; नॅशनल हायवेवरील खड्डे पाहून 'परम सुंदरीं'नी केला चक्क Ramp walk

छत्तीसगढमधील दुर्ग जिल्ह्यात (walk in Chhattisgarh) खराब झालेल्या रस्त्यांबाबत लक्ष वेधण्यासाठी काही महिलांनी चक्क रस्त्यावरच रॅम्प वॉक (Ramp walk) केला आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 मध्ये प्रचंड खड्डे पडले असून त्याचा आम्हाला त्रास होत असल्याची या महिलांची तक्रार आहे.

0105

खराब झालेल्या या रस्त्यांबाबत निषेध करताना महिलांनी पाण्याने भरलेल्या खड्ड्यांमध्ये आणि गाणे लावून रॅम्प वॉक केला.

जाहिरात
0205

हा संपूर्ण कार्यक्रम खराब रस्ता दुरुस्त करण्यासाठी आपल्या तक्रारी प्रशासनापर्यंत पोहचवण्यासाठी होता. निदर्शनादरम्यान घोषणाबाजीही करण्यात आली.

जाहिरात
0305

सर्व्हिस रोडमध्ये मोठ्या प्रमाणात खड्डे तयार झाले आहेत ज्यामुळे अनेक लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहे. दररोज डझनभर लोक अपघातांना बळी पडत आहेत.

जाहिरात
0405

अनेक वेळा प्रशासनाचे लक्ष वेधूनही त्यावर काहीच कार्यवाही न झाल्याने असे अनोखे प्रदर्शन करून प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले.

जाहिरात
0505

महिला जनजागृतीसाठी काम करणाऱ्या समाजसेविका सोनाली चक्रवर्तीसह डझनहून अधिक महिलांनी प्रात्यक्षिकात भाग घेतला.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या