JOIN US
मराठी बातम्या / Viral / भावाच्या लग्नात पूर्ण केली अपुरी इच्छा! अशी लग्नपत्रिका तुम्ही कधी पाहिली नसेल

भावाच्या लग्नात पूर्ण केली अपुरी इच्छा! अशी लग्नपत्रिका तुम्ही कधी पाहिली नसेल

मराठवाड्यातील एका पोलिसाने कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आर आर आबांचा फोटो भावाच्या लग्नपत्रिकेवर छापला आहे.

जाहिरात

मोबाइल आणि इंटरनेटच्या जगात सध्या सगळ्या गोष्टी सोशल मीडियावर शेअर केल्या जाव्या असा काहींचा अट्टाहास असतो. फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटर यासारख्या सोशल मीडिया अकाउंटवर आपले अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर करण्याची चढाओढच लागलेली असते. कुठे फिरायला जाणं असो किंवा घरात एखादी पार्टी असो प्रत्येक गोष्टी या सोशल मीडियावर शेअर केल्या जातात.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 20 जानेवारी : राज्याचे माजी गृहमंत्री दिवंगत आर आर पाटील यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात आपला वेगळा ठसा उमटवला होता. 2015 मध्ये त्यांचे अल्पशा आजाराने निधन झालं. मराठवाड्यातील एका पोलिसाने कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आर आर आबांचा फोटो भावाच्या लग्नपत्रिकेवर छापला आहे. बीड तालुक्यातील चऱ्हाटा इथल्या नितीन बाबासाहेब जाधव या तरुणाची ही लग्नपत्रिका सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. आर आर पाटील हे 2014 मध्ये राज्याचे गृहमंत्री होते. त्यावेळी पोलिसांत 11 हजार जणांची मेगाभरती झाली होती. या मेगाभरतीमध्ये पोलीस नोकरी मिळाल्याची आठवण आणि त्यासाठी आर आर पाटील यांची कृतज्ञता व्यक्त करावी म्हणून चऱ्हाटा इथल्या कृष्णा जाधव यांनी भावाच्या लग्नपत्रिकेवर आबांचा फोटो छापला आहे. शनिवारी हा लग्नसोहळा पार पडला.

संबंधित बातम्या

लग्नपत्रिकेवरील फोटोबद्दल सांगताना कृष्णा जाधव म्हणाले की, माझ्या लग्नपत्रिकेवर आबांचा फोटो छापायचा होता. पण 2016 मध्ये माझ्या लग्नात अशी पत्रिका छापता आली नाही. ही इच्छा आता भावाच्या लग्नात पूर्ण झाली. तेव्हा जर मेगाभरती झाली नसती तर पोलिसात भरती होता आलं नसतं अशी भावना कृष्ण जाधव यांनी व्यक्त केली. 2014 मध्ये झालेल्या मेगाभरतीत कृष्णा जाधव हे पोलिसात रूजू झाले. सध्या बीड वाहतूक शाखेत ते सेवा बजावत आहेत. कृष्णा जाधव यांचा भाऊ नितीन जाधव हेसुद्धा पोलिसात आहेत. 2016 मध्ये भरती झालेले नितीन जाधव बीड शहर पोलिस ठाण्यात सेवा बाजवत आहेत. वाचा : पुण्यात अजितदादांनी लावला कामाचा धडाका, काँग्रेसने घातला खोडा!

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या