प्रतिकात्मक फोटो,
मुंबई 16 ऑक्टोबर : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा काही नेम नाही. येथे बऱ्याचदा लोक प्रसिद्धीसाठी काहीही करण्याची तयारी दाखवतात. अनेक लोक तर आपल्या जीवाची देखील पर्वा करत नाही. यामुळेच अनेक अपघात घडले असल्याचे फोटो किंवा व्हिडीओ आपण पाहिले आहे. परंतू एका व्यक्तीने प्रसिद्धी मिळवण्यासाठी हद्दच पार केली आहे. ही व्यक्ती साधी-सुधी व्यक्ती नाही तर एक पॉलिटिकल व्यक्ती आहे. जिने सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी आपले प्रायव्हेट व्हिडीओ शेअर केले आहेत. अनेकदा एखाद्या कपलचं किंवा एखाद्या तरुणीचा एमएमएस काढून त्यांना धमकावण्याच्या उद्देशानं प्रायवेट व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केले जातात. यापूर्वी असे व्हिडीओ ‘अपघाताने’ लीक होत होते, पण आता ट्रेंड थोडा बदलला आहे. लोकांचे लक्ष वेधण्यासाठी लोकं स्वतः त्यांचे खाजगी व्हिडीओ सार्वजनिक डोमेनवर शेअर करत आहेत. न्यूयॉर्कमधील मॅनहॅटन येथून ताजे प्रकरण समोर आले आहे. येथे या पॉलिटिकल व्यक्तीने स्वत:च आपला खासजी व्हिडीओ शेअर केला. एवढंच नाही, तर या व्यक्तीसोबत अडल्ट मॉडल देखील होती. जे व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे.
हे ही पाहा : Video : पानपट्टीच्या दुकानातील बल्बची चोरी, सीसीटीव्ही पाहाताच पानवाल्यालाही बसला धक्का
एका वृत्तानुसार, न्यूयॉर्क काँग्रेसच्या जागेचे थर्ड पार्टी उमेदवार माइक इटकिस यांनी आपला प्रचार लोकांमध्ये लोकप्रिय करण्यासाठी अतरंगी व्हिडीओ व्हायरल केले. मिळालेल्या माहितीनुसार, 53 वर्षीय आर्मी सायबर ऑपरेशन्स ऑफिसर माइक इटकिस हे जेरी नॅडलर यांच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत. आपला निवडणूक प्रचार लोकप्रिय व्हावा यासाठी त्यांनी त्यांचा प्रायवेट व्हिडीओ लीक केल्याचे मानले जात आहे.
mike itkis
मिकेनने त्यांचा व्हिडीओ अडल्ट साइटवर जारी केल्याचे सांगितले जात आहे. हा व्हिडीओ 2021 चा आहे. यामध्ये माइक एका अडल्ट मॉडलसोबत दिसत आहे. हेही वाचा : 56 वर्षांच्या बापानं मुलींसोबत थाटला आपला संसार; ‘या’ 5 व्या लग्नाची कहाणी अजबच… माइकने एक व्हिडीओ शेअर करताना सांगितले की, त्याने वेश्याव्यवसाय करण्याच्या समर्थनार्थ हे केले आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली आहे. एकीकडे विरोधक माईकवर जोरदार टीका करत असताना दुसरीकडे त्यांना सोशल मीडियावरही जोरदार ट्रोल केले जात आहे. परंतू असं होत असलं तरी माइकला याचं काहीही वाटत नाहीय.