नवी दिल्ली, 28 डिसेंबर : आपल्या देशातील क्रिकेटप्रेम जगजाहीर आहे. भारतात क्रिकेटकडे फक्त छंद म्हणून नाही तर एक सेवा म्हणून पाहिली जाते. त्यामुळं लहाणग्यांपासून ते थोरामोठ्यापर्यंत सर्वच क्रिकेटचे चाहते असतात. कारण क्रिकेट खेळण्यासाठी मैदानाची नाही तर आवडीची किंवा इच्छाशक्तीची गरज असते. आजही शाळेच्या पटांगणात किंवा गल्ल्यांमध्ये मुलं दिवसरात्र क्रिकेट खेळतान दिसतात. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. सध्या सोशल मीडियावर एका दिव्यांग मुलाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल. या व्हायरल व्हिडिओमध्ये एक अपंग मुलगा आपल्या गुडघा आणि हाताचा वापर करून धावताना दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये मैदानावार गवतही नाही आहे. त्यामुळं दगड-मातीत हा मुलगा हातांवर धालत आहे. त्यामुळं सध्या सोशल मीडियावर या मुलाच्या इच्छाशक्तीचे कौतुक केले जात आहे. वाचा- दिव्यांग असूनही असा साधला फोनवर संवाद, आनंद महिंद्रांनी शेअर केला VIDEO
वाचा- इम्रान खानच्या मंत्र्यानं TikTok स्टारला पाठवले न्यूड फोटो… VIDEO व्हायरल या व्हिडीओमध्ये हा मुलगा शॉट लगावत गुडघ्यावर आणि हातांवर एक धाव पूर्ण करतो. यानंतर तो सहकारी फलंदाजाने घेतलेल्या शॉटवर एक रनही पूर्ण करतो. जेव्हा मुल धाव घेण्यासाठी धावताना धूळ देखील उडताना दिसते. त्यामुळं ट्विटरवर या मुलाचे कौतुक केले जात आहे. या व्हायरल व्हिडीओ भारतीय वनाधिकारी (आयएफएस) सुधा रॅमॉन यांनी आपल्या ट्विटर हँडलवर ट्विट केला आहे.
वाचा- 32 कोटींची लॉटरी लागल्यानंतर लाईव्ह कार्यक्रमातच पत्रकारानं दिला राजीनामा आणि… सुधा यांनी हा व्हिडीओ शेअर करताना, ‘माझ्याकडे शब्द नाहीत. ज्यांना क्रिकेट आवडते त्यांच्यासाठी आणि ज्यांना ते आवडत नाही त्यांनीही हा व्हिडीओ पाहावा’, असे सांगितले. 56 सेकंदाचा हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत अहे.