JOIN US
मराठी बातम्या / Viral / Viral Video: ‘गुटखा थुंकायचाय, विमानाची खिडकी उघड’...प्रवाशाची एअर होस्टेसकडे अजब मागणी

Viral Video: ‘गुटखा थुंकायचाय, विमानाची खिडकी उघड’...प्रवाशाची एअर होस्टेसकडे अजब मागणी

Viral Video : व्हायरल व्हिडिओत एक प्रवासी हातात गुटखा असून बाहेर थुंकण्याकरिता विमानाची खिडकी उघडण्याची विनंती एअर होस्टेसला करत असल्याचं पाहायला मिळत आहे.

जाहिरात

‘गुटखा थुंकायचाय, विमानाची खिडकी उघड’...प्रवाशाची एअर होस्टेसकडे अजब मागणी

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 29 जानेवारी : गेल्या काही दिवसांपासून विमान कंपन्या अनेक कारणांमुळे चर्चेत आहेत. विमान उड्डाण उशिरानं होणं, प्रवाशांमधले वाद-विवाद, विमानतळावरच्या सेवा-सुविधांमध्ये अडचणी अशा प्रकारच्या गोष्टी सातत्याने घडत आहेत. त्यातच आता एक नवीन घटना समोर आली आहे. ही घटना एका विमान प्रवाशाशी संबधित आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे. या व्हायरल व्हिडिओत एक प्रवासी हातात गुटखा असून बाहेर थुंकण्याकरिता विमानाची खिडकी उघडण्याची विनंती एअर होस्टेसला करत असल्याचं पाहायला मिळत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यावर कोणालाही हसू आवरणार नाही. या मजेदार व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. गेल्या काही दिवसांत विमान आणि विमानतळाशी निगडित अनेक घटना घडल्याचं तुम्हाला माहिती असेल. एका प्रवाशाने महिला सहप्रवाशाच्या अंगावर लघवी केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. हे प्रकरण सध्या जोरदार चर्चेत आहे. आता विमानाशी संबंधित आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे; मात्र ती खरी घटना नसून, केवळ प्रँक म्हणून शूट केलं असावं असं वाटतं. एक प्रवासी हातात गुटखा मळत असून बाहेर थुंकण्यासाठी एअर होस्टेसला विमानाची खिडकी उघडण्यास सांगत असल्याचं व्हायरल व्हिडिओत पाहायला मिळतं. हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवरच्या videonation.teb नावाच्या हँडलवरून शेअर करण्यात आला आहे. सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवर हा व्हिडिओ सध्या पाहायला मिळत आहे. या व्हिडिओला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. हेही वाचा:   हॉरर स्टोरीपेक्षा भयंकर; एक घर, दोन मृतदेह आणि मृत्यूचे गूढ, बहिणीच्या सापळ्याला घास भरवायचा भाऊ… या व्हायरल व्हिडिओत अनेक प्रवासी एका विमानातून प्रवास करत असल्याचं दिसतं. विमान उंच आकाशात आहे. त्यात एक प्रवासी हातात गुटखा मळत आहे. त्याच वेळी तो एअर होस्टेसला बोलवतो. त्याची हाक ऐकून एअर होस्टेस त्याच्या सीटजवळ येते. ती या प्रवाशाला काही विचारायच्या आतच हा प्रवासी `खिडकी उघडा. मला गुटखा थुंकायचा आहे,` असं म्हणतो. या प्रवाशाचं म्हणणं ऐकून एअर होस्टेसला क्षणभर आश्चर्याचा धक्का बसतो आणि ती जोरात हसू लागते. ही अजब मागणी ऐकल्यानंतर विमानातल्या अन्य प्रवाशांनाही हसू आवरत नाही, असं पाहायला मिळतं. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. इन्स्टाग्रामवर तर या व्हिडिओने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या